गौतम नगरी चौफेर //अशोककुमार उमरे गडचांदूर // आपल्या मनमर्जीने गुलामा सारखे राबवून आणि कमी पैशात जास्त काम करून घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापक परप्रांतीय कामगारांना भरती करून स्थानिक कामगाराचे रोजगार हिरावून घेतल्या जात आहेत. यासाठी स्थानिय लोभी लबाड व प्रलोभित नेते सुद्धा तेवढेच जबाबदार आहे. ते आपली चिरीमिरी घेऊन स्थानिक कामगारांच्या रोजगाराच्या बाबतीत उदासीन आणि वेळकाढूपणा धोरण अवलंबित असल्यामुळे कंपनी व्यवस्थापन मस्तवालपणा अंगिकारत असतात आणि स्थानिक कामगारांना धुडकावून लावत असतात. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकजुटीने सामना करून आपले न्याय हक्क आणि अधिकार मिळवून घेतले पाहिजे. असे प्रतिपादन अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी केले.
मौजा वरवट तालुका जिल्हा चंद्रपूर येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणात ग्रामपंचायत सरपंच कुमारी सुमित्रा रायपूरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्थानिक भुमिपुत्राना कंपनीत नोकरी मिळावी म्हणून सभा घेण्यात आली.

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे, संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे, शिवसेना (शिंदे) जिल्हा प्रमुख पॅरामेडिकल विंग महाराष्ट्र, रिपब्लिकन पक्षाचे माजी उपाध्यक्ष कोमल रामटेके, रिपब्लिकन सेनेचे इंजी. तथागत पेटकर, पत्रकार मोहबे, सामा. कार्यकर्ते नारायण जुमडे, संजय रामटेके, आकाश ताकसांडे, रजनीकांत कातकर इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सभेकरीता चोरगाव मामला, म्हसाळा, वरवट इत्यादी गावातील बेरोजगार युवक आले होते.
सभेत प्रमुख पाहुण्यांनी समयोचित विचार व्यक्त केले.
स्थानिक भुमिपुत्राना कंपनीत काम मिळण्याकरिता व्यापक आंदोलन करण्याचे एकमुखाने ठरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य किशोर खोब्रागडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल शेंडे, चंद्रकांत कावळे, अजय आदे, रोशन मोहुर्ले, रुपेश कावळे, अमित चौधरी, आकाश कोकाटे, दिनेश मेश्राम, अनिमेश रामटेके, अक्षय रामटेके, सचिन चौधरी, सचिन मोहुर्ले, रोशन लेणमुरे, रमिश मोहुर्ले, शरद लोणबले, सोनू बोरुले, संदेश शेंडे, प्रवेश वाघमारे, सुरेश चौधरी, राहुल साव, नागेश साव, रॉयल, नितेश रायपूरे, स्नेहल दुर्योधन, अनिकेत रायपूरे, आदित्य रत्नपारखी, सौरभ रंगारी, आयुष रत्नपारखी, अश्विन रायपुरे, गणपत लोणबले, अनुप रायपूरे, शुभम रामटेके, अतुल लोनबले, गौरव मोहुर्ले, सुरज महाडोळे, साहिल रामटेके, गणेश महाडोळे, कुणाल महाडोळे, तेजस गुरनुले, आर्यन रत्नपारखी, मनीष सोयाम, प्रज्वल रायपुरे, साहिल कलारे, करण मारबते, समृद्ध दुपारे, राजू कंडे, विकास कोकोडे, गजानन मोहुर्ले, मयूर रामटेके, अमन खोब्रागडे, संजय जंगटे, आशीष रामटेके, निखिल कावळे, गणेश निकोडे, राहुल दुर्योधन, वैभव लोनबले, अनिकेत लोनबले, प्रशांत आदे, पवन सोयाम, प्रशांत बोरुले, अक्षय महाडोळे, मनीष बोरुले इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.


COMMENTS