जिवती येथे लाडक्या बहिणींनी साजरा केला ‘आमचा देवाभाऊ रक्षाबंधन’ सोहळा..
गौतम नगरी चौफेर प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण. जिवती, दि. २२
राखी हा केवळ एक रेशमाचा धागा नसून तो बहीण-भावाच्या नात्याची, स्नेहाची, विश्वासाची आणि एकमेकांच्या रक्षणाची गाठ आहे. आमच्या लाडक्या बहीणींचा आशिर्वाद आमच्यासाठी लाखमोलाचा असून त्यांचा स्नेहपुर्वक आशिर्वादच आमच्या महायुती सरकारचे बळ आहे. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले. भाजपा जिवती तालुका महिला मोर्चाचे वतीने स्थानिक संत थॉमस इंग्लिश मिडीयम शाळेत आयोजित देवाभाऊ रक्षाबंधन सोहळ्यात ते बोलत होते.
आमदार भोंगळे पुढे म्हणाले की, बहिणींच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील आपले महायुती सरकार नेहमीच तत्पर आहे. पहाडावरील आमच्या बहीणींनी सर्व क्षेत्रात पुढे यावे, तुमचा दादा कायम तुमच्या पाठीशी उभा आहे. अशी ग्वाही देतो, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात जिवती शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या लाडक्या बहिणींनी आमदार देवराव भोंगळे यांना राख्या बांधून आपले बहीण भावप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. यावेळी मंचावर अर्चना भोंगळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, नगराध्यक्षा अनुसया राठोड, शहराध्यक्ष राजेश राठोड, महामंत्री प्रल्हाद मदने, महामंत्री गोविंद ठोकरे, तुकाराम वारलवाड, अशपाक शेख, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अंजना पवार, शहराध्यक्षा पुष्पा सोयाम, रशीद शेख, नगरसेविका अहिल्याबाई राठोड, अश्विनी गुरमे, उर्मिला बेल्लाळे, दिगंबर आंबटवार, चंद्रकांत घोडके, सुबोध चिकटे, राजेश राठोड, संतोष जाधव, पंढरी वाघमारे, गोपीनाथ चव्हाण, आनंद कदम, कमलाकर जाधव, लाला शेख, संजय मोठेवाड, भारत चव्हाण, फरीद शेख, रतिक चुकलवार, कपिल राठोड, राज बेल्लाळे, रमेश राठोड, साहेबराव राठोड, सुनीता जाधव, वर्षा गुरमे, धृपता मरसकोल्हे, मेघा आगलावे, कमला राठोड, सारिका नंदेवाड, अमृतवर्षा पिल्लेवाड, विजया चव्हाण, पर्वता गव्हारे, नयना शिंदे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.





COMMENTS