गौतम नगरी चौफेर प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण.
जिवती:- गडचांदूर ते पाटण मार्गे तेलंगणा राज्यात वाहनातून अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पाटण पोलिसांना मिळाली असता सदर मार्गावर सापळा रचून नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान समोरून येणाऱ्या एका पिकअप वाहनाला थांबवून पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली तेव्हा, त्यामध्ये 5 गोवंशीय जनावरे दोरीने बंधून दिसून आले. विचारणा केली असता सदर जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. यावरून वाहनातील आरोपी मोहसीन सलीम शेख रा. गडचांदूर याला ताब्यात घेऊन संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जनावरांची सुटका करून त्याच्या ताब्यातील एक महेन्द्रा पिकअप वाहन क्रं.MH/34 /CT/4197, किं.5 लाख आणि 5 जनावरे किं. 50 हजार, असा एकूण 5 लाख, 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई 22 ऑगस्ट रोजी पाटण पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, यांच्या मार्गदर्शनात, उप पोस्टे. पाटणचे ठाणेदार सपोनि सुधाकर कोकोडे, यांच्या नेतृत्वात पोअं.रामचंद्र पुष्पपोळ, ज्ञानेश्वर मांडवे, यांनी केली आहे.


COMMENTS