गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – साकोली शेंदुरवाफा नगरपरिषद येथील नवनियुक्त नगराध्यक्ष देवश्री मनीष कापगते यांनी सोमवारी त्यांच्या नगरपरिषद कार्यालयात आपल्या पदग्रहण केले या प्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे तर्फे व एशियन न्यूज चॅनल तर्फे नगरपरिषद कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला समोर जाताना सांगितलं की, साकोली शेंदूरवाफा येथील नाल्याच्या समस्या, रोड च्या समस्या, स्वच्छता, आरोग्य अशा विविध समस्या मोठ्या प्रमाणात आहेत ते आपण सोडवण्याच्या माझ्या परीने मी प्रयत्न करीन व लोकांनी सुद्धा आमच्या नगरी परिषदेला सहकार्य करावे असे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळेस एशियन न्यूज चैनल न्यूज अँकर शितल नागदेवे, यांना चॅनेल आयडेंटिटी कार्ड देऊन नगराध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेवक मनीष कापगते, संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी सर, महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष शितल नागदेवे, प्रतिमा राऊत, हिरा साखरे, रत्ना खंडारे, सरिता बडोले, नम्रता राऊत,इतर महिला संघटनेच्या सर्व पदाधिकारी या उपस्थित होते.


COMMENTS