गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – भंडारा तालुक्यातील पहेला येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात 5 ऑक्टोंबर 2024 ला सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत समता फाउंडेशन महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर व ग्रामपंचायत कार्यालय पहेला यांच्या सहकार्याने निशुल्क नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नेत्र शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि योग्य सल्ला मार्गदर्शन केले जाईल. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची महात्मे नेत्र रुग्णालय सोमलवाडा नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची जाने येणे, राहण्याची, जेवण्याची मोफत सोय केली जाईल. शिबिरात मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना भरतीची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल. रुग्णांनी तपासणीला येते वेळेस आधार कार्ड व घरचा मोबाईल नंबर सोबत आणावे. वरील शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समता फाउंडेशन महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर, ग्रामपंचायत कार्यालय पहेला यांनी केलेले आहे.
COMMENTS