वीरेंद्र सिंह भट्टीने पावरलिफ्टींगच्या १२५ किलो वजनी गट स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक.

HomeNewsनागपुर डिवीजन

वीरेंद्र सिंह भट्टीने पावरलिफ्टींगच्या १२५ किलो वजनी गट स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक.

– पुणे येथे वल्ड रॉ पावरलिफ्टींग फेडरेशन वतीने आयोजित मध्य भारत प्रादेशिक अजिंक्य स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा १ ऑगस्ट
                       वीरेंद्र सिंह भट्टीने पॉवरलिफ्टिंगमध्ये पुन्हा एकदा यश संपादन केले आहे.हरभजन सिंह भट्टी यांचे सुपुत्र वीरेंद्र सिंह भट्टी यांनी पुन्हा एकदा पॉवरलिफ्टिंगमध्ये आपली चमक दाखवतदिनांक २५ ते २७ जुलै २०२५ दरम्यान पुणे येथे वर्ल्ड रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित मध्य भारत प्रादेशिक अजिंक्यपद स्पर्धेत जूनियर वयोगट आणि १२५ किलो वजनी गटात स्पर्धा करताना प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा एकूण SBD (स्क्वॉट, बेंच प्रेस, डेडलिफ्ट) ६६५ किलोग्रॅम इतका होता. यामध्ये त्यांनी २८० किलोग्रॅम स्क्वॉट, १२५ किलोग्रॅम बेंच प्रेस आणि २६० किलोग्रॅम डेडलिफ्ट अशा उत्कृष्ट वैयक्तिक लिफ्ट्स केल्या.
वीरेंद्रच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबासोबतच त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाची लहर उसळली आहे. त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page