आवारपूर गावचा कार्तिक भारतीय सैन्यात

HomeNewsनागपुर डिवीजन

आवारपूर गावचा कार्तिक भारतीय सैन्यात

गौतम नगरी चौफेर (आवारपूर) – कोरपना तालूक्यातील आवारपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आणी भीमराव बहुउद्देशील संस्था  व आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतिने  कार्तिक वंदना गजानन कोंडेकर  यांचा सन्मान सोहळा नुकताच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती परिसरात यावेळी साजरा करण्यात आला, दरम्यान कार्तिक गजानन कोंडेकर यांची भारतीय सैन्यात निवड झाली  या भारतीय सैन्य दलात दाखल होणारा तो आवारपूर गावातील पहिला तरूण आहे.

त्याच्या यशाबद्मल आई रमाबाई महिला मंडळाच्या वतिने  त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी श्नीमती पुष्‍पाबाई बदरे, शिला धोटे, चेतना खाडे,शुद्धलेखा खाडे, यशोधरा चांदेकर, शितल ठमके, कल्याणी वानखेडे, सविता नारनवरे, धम्माबाई जीवने, सविता बदरे, गिरजाबाई चांदेकर, स्मिता बदरे, चैताली वानखेडे, सोनी सातपुते, श्नेया धोटे आदी गावातील व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम धोटे, मुलिधरजी वानखेडे, रमेशजी खाडे, प्रमोदजी चांदेकर, दर्शनजी बदरे, सुधीरजी ठमके, प्रज्ञाशिल खाडे तसेच ग्रामपंचायत आवारपूर गावच्या सरपंच सौ प्रियंकाताई दिवे, सदस्य सुरेशजी दिवे, सदस्य कल्पतरू कनन्नाकेसह सर्व कार्यकर्ते या सन्मान सोहळा कार्यक्रंमाला उपस्थित होते, या कार्यक्रंमाचे  संचालन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे महासचिव दर्शनजी बदरे यांनी केले,
त्याच्या यशामुळे आवारपूर गावातील  विद्यार्थ्यांत उत्साह, जोश आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page