पिपर्डा ग्राम पंचायत घनकचरा व्यवस्थापन बोजवारा : गावात डासांचा प्रादुर्भाव

HomeNewsनागपुर डिवीजन

पिपर्डा ग्राम पंचायत घनकचरा व्यवस्थापन बोजवारा : गावात डासांचा प्रादुर्भाव

गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे ) – चंद्रपूर जिल्ह्यातिल (कोरपना आदिवासीबहुल तालुक्यातील कोरपना) डोंगर पायथ्याशी असलेल्या एकेकाळी राज्यात व जिल्हास्तरावर आदर्शगाव म्हणून ओळख असलेल्या पिपर्डा गावात अनेक समस्या उद्‌भवल्या असताना ग्राम पंचायत पदाधिकारी गाढ झोपेत असल्याचा प्रत्यत गावकऱ्याना येत आहे स्वच्छ सुंदर गावचे तिन तेरा झाले आहे गावात सामुहीक शौचालय महिला पुरुषा करीता १९९४ मध्ये बांधकाम होऊन त्याचा वापर गावकरी करीत उघड्यावर शौचास बंद झाले होते मात्र नळ जोळणी न करता पाण्याचे टाकी बांधली मात्र नळ दुरुस्ती व जोडणी नसल्याने शोभेची वास्तू म्हणून टाकी धुळ खात आहे स्वच्छतेचा अभाव असून दुरुस्तीच्या नावावर संरपच व सचिवानी लाखो रुपये स्वच्छता कामावर खर्च दाखविला मात्र प्रत्यक्षात कामे झालीच नाही असा आरोप गावकऱ्यानी केला आहे गावातील जूनीशाळा परिसरात व वार्ड क्र १ च्या नाल्या तुडूंब भरलेल्या असताना गेल्या ४ वर्षा पासून सफाई केली नसल्याचे सांगितले तर सफाई न करता ग्राम पंचायत निधि सफाई कामावर खर्च दाखवून निधि चा डल्ला तत्कालीन सचिवानी मारल्याची चर्चा गावात असून आगष्ट २०२५ च्या ग्राम सभेत ठरलेल्या विषयावर अमलबजावणी झालेली नाही  गट ग्रामपंचायत कुसळ येथिल पेसा व १५ वित्तीय निधिचा अपहार व अनियमित व आर्थिक व्यवहार नियम बाह्य झाल्याची तक्रार लालशाव पोराते यांचे सह गावकऱ्यानी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांचे कडे दिल्या  अकेक्षणांत अनेक अनियमीतता झाल्याचा ठपका असताना चौकशी मध्ये दिरंगाई का असा प्रश्न गावकरी विचारू लागले आहे

COMMENTS

You cannot copy content of this page