कामगार कल्याण केंद्र भंडारा येथे साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

HomeNewsनागपुर डिवीजन

कामगार कल्याण केंद्र भंडारा येथे साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र येथे आज दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवार ला सकाळी 11/00 वाजता साहित्यरत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे MSRTC भंडारा चे कामगार कल्याण समिती चे पंकज वानखेडे यांच्या हस्ते फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारा केंद्र संचालक सचिन रोडगे उपस्थित राहून साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाला हर्षल बिल्लोरे, चेतन ठाकरे, कामगार केंद्राचे अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page