गडचांदूर – सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 4, येथून निर्दलीय उमेदवार मा. निलेशभाऊ ताजने यांच्या नेतृत्वात  शानदार रॅली व विकाससभा

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूर – सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 4, येथून निर्दलीय उमेदवार मा. निलेशभाऊ ताजने यांच्या नेतृत्वात  शानदार रॅली व विकाससभा

गौतम नगरी चौफेर //गौतम धोटे //गडचांदूर नगर परिषद  प्रभाग क्र. 4 चे लोकप्रिय उमेदवार यांनी गडचांदूर शहर विकास आघाडीच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. रॅलीत मा. निलेशभाऊ ताजने  आणि  प्रभाग क्र. 4 चे उमेदवार श्री. महेश आवारी आणि सौ. संगीता थेरे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.

या भेटीदरम्यान निलेशभाऊंनी प्रभागाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी पुढील महत्त्वाकांक्षी उपक्रमांची रूपरेषा स्पष्टपणे मांडली—
🔸 आरोग्य, पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि वीज या पायाभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा
🔸 स्वच्छ आणि सुजलाम-सुफलाम गडचांदूरसाठी विशेष स्वच्छता मोहीम
🔸 महिला व युवकांसाठी केंद्रित कौशल्य प्रशिक्षण उपक्रम
🔸 वृद्ध आणि दिव्यांगांसाठी सुविधा अनुकूल प्रभाग निर्मिती
🔸 शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक सुविधा केंद्रांची उभारणी व सुधारणा

याप्रसंगी नागरिकांनीही आपल्या अडचणी आणि अपेक्षा उत्साहाने मांडल्या, आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निलेशभाऊंनी ठाम व त्वरित कृतीचे आश्वासन दिले.

नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, उत्साह आणि विश्वास पाहता, निलेशभाऊ ताजने यांची विकासयात्रा वेगाने पुढे जात असून, प्रभागातील लोकमत त्यांच्या बाजूने मजबूतपणे उभे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page