शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून २० हजारांची मदत

HomeNewsनागपुर डिवीजन

शेतकऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून २० हजारांची मदत

वीज पडून बैलजोडीचा झाला होता मृत्यू

गौतम नगरी चौफेर कोरपना : वीज पडून दोन बैल गमावलेल्या वडगाव येथील शेतकरी नागोबा मारोती देवाळकर यांना कृषी उत्पन्न बाजार समिती, कोरपना यांच्यातर्फे २० हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली.

ही मदत बाजार समितीचे सभापती अशोक बावणे यांच्या हस्ते धनादेश स्वरूपात मारोती देवाळकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न म्हणून ही मदत तत्परतेने दिल्याचे यावेळी सभापती अशोक बावणे यांनी सांगितले.

COMMENTS

You cannot copy content of this page