विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सुसंस्कार उजविणे ही काळाची गरज – प्रा. आशिष देरकर

HomeNewsनागपुर डिवीजन

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सुसंस्कार उजविणे ही काळाची गरज – प्रा. आशिष देरकर

‘फर्स्ट डोनेशन डे’च्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन

गौतम नगरी चौफेर //कोरपना – विद्यार्थ्यांची केवळ अभ्यासातील प्रगती पुरेशी नाही, तर त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि सुसंस्कारही असणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवत्तेबरोबरच चारित्र्य, शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली पाहिजे. ही काळाची खरी गरज आहे असल्याचे प्रतिपादन प्रा. आशिष देरकर यांनी केले.
       पिंपळगाव येथे सामाजिक कार्यकर्ते रमेश लोणबले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या लक्ष्मण ट्युशन क्लासेसच्या ‘फर्स्ट डोनेशन डे’ निमित्त आयोजित उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

या ट्युशन क्लासची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे १ रुपया प्रती दिवस  याप्रमाणे ३० दिवस ३० रुपये या अत्यंत माफक दरात शिकवणी दिली जाणार आहे. शिक्षणासाठी आर्थिक अडथळा येऊ नये या हेतूने गावातील दानशूर पालक व नागरिकांनी यासाठी स्वखुशीने डोनेशन दिले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम ही पहिलीच आगळी-वेगळी संकल्पना असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर जोगी होते. मंचावर उपसरपंच आबाजी बोबडे, राजकुमार पानघाटे, खुशालराव गोहोकार महाराज, घुलाराम वरारकर, भाऊराव बोभाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू बोढाले यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन आचल पानघाटे व सोनाली विधाते यांनी केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता मिळण्यास मदत होणार असून, समाजाने शिक्षणासाठी एकत्र येणे ही आशादायक बाब आहे.
प्रा. आशिष देरकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची शिस्त, नियमितता, स्वप्न पाहण्याचे धैर्य आणि समाजासाठी जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page