छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियान संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियान संपन्न

गौतम नगरी चौफेर तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर भद्रावती :  तहसील कार्यालयामार्फत भद्रावती मंडळाच्या वतीने ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन हॉल पेट्रोल पंप भद्रावती येथे संपन्न झाले.
     या कार्यक्रमाचे उध्दघाटक वरोरा येथील उपविभागीय अधिकारी अतुल जटाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार राजेश भांडारकर तर प्रमुख अतिथी सुनील नामोजवार माजी नगराध्यक्ष, विजय वानखेडे माजी जि.प. सदस्य, नायब तहसीलदार काळे, अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष, प्रफुल चटकी माजी उपनगराध्यक्ष, पोलिस निरीक्षक योगेश पारधे साहेब, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात महसूल विभागातील सर्व विभागांचे टेबल लावण्यात आले होते त्या माध्यमातून सामान्य नागरिक व शेतकरी बंधूंना यांचा लाभ झाला, विविध बॉकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत मार्गदर्शन करण्यात आले, भुमि अभिलेख विभागाकडून सुध्दा शेतकऱ्यांचे विविध विषय मार्गी लावले, आरोग्य विभागानी शेतकऱ्यांचे आरोग्य तपासणीचे काम केले, भुमी अभिलेख विभागाने यात सहभाग घेऊन शेतकऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लावले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडल अधिकारी गहुरकार आभार प्रदर्शन नायब तहसीलदार आकनुरवार यांनी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page