निबाळा येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन.

HomeNewsनागपुर डिवीजन

निबाळा येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र) :– ग्रामपंचायत कळमना नेहमीच सातत्यपूर्ण विकासकामांसाठी ओळखली जाते.  याच परंपरेतून कळमना ग्रामपंचायत अंतर्गत मौजा निबाळा येथे सामान्य जनतेच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते पार पडले. स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या सार्वजनिक शौचालयामुळे गाव अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होण्यास मदत होईल, असा विश्वास सरपंच नंदकिशोर वाढई यांनी यावेळी व्यक्त केला.
        या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, पोलीस पाटील गोपाल पाल, ज्येष्ठ नागरिक महादेव पाटील, मोतीराम झाडे, विजय गेडाम, सुधाकर मेक्षाम, शिला बोरकर, शालु झाडे, कुसुम मेक्षाम, सुनिता बोरकर, मोडघरे बाई, घाटे बाई यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page