गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – पवनी तालुक्यातील चिचाळ येथे सकाळी 8.45 वाजता महाकारुणिक बुद्ध विहार चिचाळ येथे पूजनीय भदंत सुमंगली यांचे आगमन व स्वागत होणार असून सकाळी 9 वाजता महाकारुणी बुद्धविहार चिचाळ येथून धम्मचारी रॅलीला सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी त्रिरत्न बुद्ध विहार पाथरी पुनर्वसन येथे धम्मचारीकेचे आगमन व धम्म रॅलीचे स्वागत होईल. सकाळी 10.30 वाजता धम्मचारीकेचे शांतीवन बुद्ध विहाराकडे प्रस्थान होईल. त्याचप्रमाणे सकाळी 11 वाजता शांतीवन बुद्धविहार येथे आगमन व स्वागत होईल. दुसऱ्या सत्रात सकाळी 11 ते 12 वंदनीय भिक्खू यांचे भोजनदान होईल. तिसरे सत्र 12.30 ते 2 वाजे ध्यान साधना होईल. धम्मदेशना दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंत बुद्ध धम्माचे दैनंदिन जीवनात महत्त्व यावर चर्चासत्र. तसेच प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. चौथे सत्र दुपारी 2.30 ते 3 वाजता दानपारमिता व आशीर्वाद. व समापन कार्यक्रम होईल. करिता या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन शांतीवन बुद्धविहार चिचाळ, सद्धम्म बुद्ध विहार, महाकारूणी बुद्धविहार चिचाळ ,त्रिरत्न बुद्ध विहार पाथरी पुनर्वसन यांनी केलेले आहे.


COMMENTS