बडे मुद्दे, बडा फैसला आज होनार

HomeNewsनागपुर डिवीजन

बडे मुद्दे, बडा फैसला आज होनार

गौतम नगरी चौफेर (वरोरा) – अखेर महाराष्ट्रात ४२वर्षापासुन गाजत असलेल्या प्रश्नावर आज चंद्रपूर जिल्ह्यातील, जिवती तालुक्यातील, मौजा कुंसूबीचा २४ आदिवासीना ४२ वर्षांपासून, सोशीत, पीडित,वंचिताना आज न्याय व हक्कासाठी लाइव्ह फैसला होनार आहे
मा.अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात फैसला होनार आहे
मा.अपर आयुक्त नागपूर यांनी दिनांक २७/०३/२०२५ रोजीच आदेश पारित केले होते व निर्देश दिले होते
संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते अनेक दिवसांपासून  कुंसूबीचा २४आदीवासीनां सोबत घेऊन, गल्ली पासून दिल्ली पर्यंत अपील करुन , पाठपुरावा करीत होते, अखेर विभागीय आयुक्त नागपूर यांना संपुर्ण हकिकत सांगितली होती
मा.अपर विभागीय आयुक्त नागपूर यांनी अपील मंजूर करुन अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना आदेश पारित केले होते
✍️मागणी खालील प्रमाणे आहे
१) एका एकरातुन ५०-६० करोड रुपयांचा मायनिंग चुनखडी निघत आहे, म्हणून कमीतकमी पाच करोड रुपये प्रति एकर जमिनीचा मोबदला देने
२) कुंसूबी गावाचे पुनर्वसन व पुनरस्थापना करने
३) प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला  कायमस्वरूपी नौकरी देने
४)जर हे होत नसेल तर मानीकगढ सिमेंट कंपनी व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये अर्धा पार्टनर म्हणून ठेवने
५)ते सुद्धा होत नसेल तर, कुंसूबी येथील माईन्स बंद करून,१५०-२०० फुट खोल खड्डे बुजवून जशी जमीन होती तशी जमीन पुर्वी प्रमाने तयार करून देणे
६) आणि ४२ वर्षांपासून आजपर्यंत जे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हाधिकारी सह इतर अधिकारी व मानीकगढ सिमेंट कंपनी व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी च्या मालकावर अट्रासिटीचा कलमानुसार FIR दाखल करने
अशी मागणी आज मा.अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात कुंसूबीचे २४आदीवासी कुंटूबासह सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे वरोरा हे  बैठकीत विषय ठेवनार आहे
मा.अपर विभागीय आयुक्त नागपूर यांच्या आदेशानुसार, बैठक आयोजित केली आहे
जनहितार्थ जारी
समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे धन्यवाद
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१

COMMENTS