गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – गुडमॉर्निंग ग्रुप तर्फे उकारा फाट्या
जवळ शिव मंदिर परिसरात व निसर्ग रम्य वातावरणावर विविध जातीचे झाडे असलेल्या ठिकाणी अभ्यास भेट दौरा करण्यात आला .त्यामध्ये विविध जातीचे झाडांना भेट देण्यात आली. विविध प्रकारचे झाडे त्यांचे गुणधर्म काय ? त्यांना कोणत्या प्रकारचे फळे येतात या गोष्टींच्या एकमेका कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करण्यात आली व त्याचा औषधी गुणधर्म काय ही वनस्पती आपल्या कोणत्या रोगावर चालेल त्याच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहेत कोणत्या झाडाला कोणते फळे येतात या सर्व गोष्टीच्या चर्चा करण्यात आली . या प्रसंगी गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष डी इ रामटेके, मनोहर मस्के, दूधराम भुरे,सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, डी ए मारवडे , अरुण चव्हाण, व्ही एम देवगिरकर , सेवानिवृत्त पीएसआय सांदेकर, प्राध्यापक नरेंद्र डहरवाल, सुभेदार मेजर मुनेश्वर, सेवानिवृत्त अधीक्षक न्याय विभाग वामन कापगते, एम डी नारनवरे, अशोक रंगारी, ताराचंद धकाते, डॉ .जितेंद्रकुमार ठाकूर, हिरालाल पारधीकर , प्रफुल्ल सूर्यवंशी व इतर गुड मॉर्निंग ग्रुपचे कार्यकर्त्या उपस्थित होते.


COMMENTS