गौतम नगरी चौफेर (हिरापूर) – कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. अरुणजी मडावी जिल्हाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी हे होते,तर मार्गदर्शक म्हणून युवा आदिवासी नेते प्रमोदजी कोडापे कोषाध्यक्ष भाजपा कोरपना ता.यांनी मार्गदर्शनात भगवान बिरसा मुंडा यांच्या150 व्या जयंतीच्या निमित्याने देशातील होऊन गेलेल्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास आजपर्यंत जो मर्यादित रीत्या माहित होता, तो विविध आदिवासी क्रांतिकारकाचा इतिहास व संस्कृतीचे कला संवर्धन हे या जनजाती गौरवाच्या निमित्याने माहिती होत आहेत व आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहेत 150 वी जयंती व जनजाती गौरव दिन या वर्षी राष्ट्रीय गौरव दिन हा महाराष्ट्रातील नागपूर येथे साजरा होणार आहेत, शालेय जीवनात विद्यार्त्यांनी शिक्षण घेऊन पुढील आयुष्याची यशस्वीवितेच्या दृष्टीने वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले, यावेळी कार्यक्रमाला तिरुपती कन्नाके महामंत्री भाजपा जमाती मोर्चा कोरपना,पत्रकार मनोज गोरे, सोशल मीडिया प्रमुख सागर धुर्वे, माध्य.मुख्याद्यापक श्री. भगत सर, प्राथ.मुख्याद्यापक श्री. ताजने सर, ठाकरे सर,कोट्टी सर,वाढई सर, आडते सर, गारघते मॅडम, झाडे मॅडम, मडावी मॅडम, जया धारणकर,श्री. मत्ते,उद्धवजी राजूरकर,, हनुमंत तुमराम,शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्था, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. प्रस्ताविक प्राथ मुख्या.श्री. ताजने सर यांनी केले, संचालन श्री. कोट्टी सर यांनी केले तर आभार, श्री. मत्ते यांनी मानले.🙏
















COMMENTS