सिद्धार्थ पथाडे, गीता पथाडे यांनी मिळविला विजय
गौतम नगरी चौफेर (राजुरा) – चंद्रपूर जिल्ह्यातील येत असलेल्या विधानसभा राजुरा तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या राजुरा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग दोनमधून रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे यांनी ७३३ मते घेत विजय प्राप्त केला. तर, गीता पथाडे यांनी प्रभाग दहामधून ६४६ मतांनी विजय मिळविला आहे. पथाडे दाम्पत्याला मतदारांनी दिलेली नगरसेवकपदाची पसंदी निश्चितच त्यांच्या कार्याची पावती समजली जात आहे.

सिद्धार्थ पथाडे हे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत. मागील अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीमध्ये ते जोडलेले आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे. सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. बालाजी नागरिक पतसंस्थेचे ते अध्यक्ष सिद्धार्थ पथाडे आहेत. आरपीआय आठवले गटाचे ते जिल्हाध्यक्ष असताना तत्त्वाची तडजोड न करीत राजीनामा दिला व विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या चळवळीला पाठिंबा दिला. मागील अनेक वर्षापासून ते जिल्हा मजदूर संघाचे हे संचालक आहेत. विदर्भ व राज्यस्तरावरसुद्धा त्याने अनेक पदे भूषवलेली आहेत. वंचित व शोषित समाजाच्या उत्थानासाठी सातत्याने ते चळवळीच्या गीता पथाडे माध्यमातून कार्यरत आहेत. राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत रिपाइंच्या दोन्ही जागावर विजय प्राप्त केल्याबद्दल माजी आमदार सुभाष धोटे व अॅड. वामनराव चटप यांनी अभिनंदन केले भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, शेतकरी संघटना व रिपाइं यांनी एकत्र येत नगरविकास आघाडी स्थापन केली. नगर विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व स्थापन करीत १६ सदस्यांसह नगराध्यक्ष अरुण धोटे निवडून आलेत. पथाडे दाम्पत्यांचे अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS