गौतम नगरी चौफेर (गर्रा बगडा प्रतिनिधी) – ग्रामपंचायत गर्रा बघेडा द्वारा जन सुविधा योजने अंतर्गत १०० मीटर नालीचा बांधकाम निकृष्ट दर्जेच्या – जन सुविधा योजनेच्या पाच लाख रुपया रकमेला चुना.
शासन योजना बनवते व राबवते पण ते जनतेच्या सुविधेसाठी व फायदे साठी होत नसेल व भ्रष्ट लोकप्रतिनिधी निकृष्ट दर्जेचा काम करत असतील तर काय कामाच त्यापैकी ग्रामपंचायत जन सुविधा विशेष अनुदान योजना अंतर्गत शा.न.नि.ग्रा.वि.ददभु २०१०/पक्र६२४२५६/दि.१६ सप्टेंबर २०१० व शा.नि.क्र.जनसु.२०१७/पक्र.१११/ यो.०६ दि.२५/१/२००८. ग्रामपंचायत नागरी सुविधा व गावच्या विकासासाठी योजने द्वारे अनेक कामे दिली जाते. त्यापैकी गर्रा बघेडा ग्रामपंचायत येथे जन सुविधा योजने अंतर्गत अनिल चौधरी यांचे घरापासून ते भुजाडेच्या शेतीपर्यंत अंदाजे १०० मीटर पाच लाख रुपये किमंतीचे मंजुरी नाली बांधकाम केला गेला. परंतु पहिल्याच पावसात नाली बांधकाम वाहून गेला, बांधकाम निकृष्ट दर्जाचा केला गेला असावा. असे जन चर्चेत कुतहुल व रोश निर्माण झाला असून केलेल्या बांधकामाची पूर्णतः चौकशी व्हावी असे येथील ग्रामस्थांची मागणी केली आहे.


COMMENTS