सौंदर्यस्थळी “कचरा सेठ”  हाच याचा फेकला धंदा

HomeNewsनागपुर डिवीजन

सौंदर्यस्थळी “कचरा सेठ”  हाच याचा फेकला धंदा

“या” गावंढळ बेजबाबदार वाहन चालकाचा शोध घ्या व दंडात्मक कारवाई करा –साकोली येथील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी


गौतम नगरी चौफेर  संजीव भांबोरे भंडारा – स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय सौंदर्यस्थळ जागेचा कसा गैरवापर केला जातो याचे प्रत्यंतर आठवडी बाजार रविवार दिवशी दिसून आले. चक्क एका महाशयाने आपले चारचाकी वाहन सौंदर्यकरण ठिकाणी लावून अकलेचे तारे तोडले. व भाजीपाला तेथेच फेकून पोबारा केला. या बेजबाबदार व साकोलीच्या निसर्गरम्य स्थळी घाण करणा-या वाहनचालकाचा तातडीने शोध घेऊन त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील निसर्गप्रेमी जनतेने मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचेकडे केली आहे. साकोली येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून तलाव पाळीला सौंदर्यकरण करण्यात आले. या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली असून सकाळ, सायंकाळी जेष्ठ नागरिक विरंगुळा घालविण्यासाठी येत असतात तर काही नागरिक मॉर्निंग वाक ला येत असतात. मात्र आठवडी बाजाराच्या दिवशी चक्क एक वाहन चालक (एम एच ३६ एए २६३३ किंवा २५३३ – ज्यावर मागे “रिषभ दि गड्डी” लिहीले आहे ) याने आपले भाजीपाल्याचे वाहन सौंदर्यकरण परिसरात लावून सडका माल फेकण्याचे कसब दाखविले. स्वतःच्या फायद्यासाठी धंदा करायचा आणि शासकीय जागेतील सौंदर्यीकरण परिसर खराब करायचे हा धंदा अलीकडे काही लोकांनी चालविलेला आहे. त्यातील हा उत्तम नमुना. बाजारात भाजीपाला विकायला आणायचे आणि सायंकाळी, रात्री उर्वरित खराब माल सौंदर्यीकरणस्थळी तलाव परिसरात फेकून द्यायचा हा केवळ आठवडी बाजाराच्या दिवशीच नव्हे तर गुजरी मधील नित्याचाच प्रकार सौंदर्यीकरण परिसरात सुरू आहे. त्यामुळे ही तलावपाळ आणि सौंदर्यकरण परिसर खराब करण्याचे कौशल्य अनेक जण करीत आहेत. आता वाहन आणि भाजीपाला समोर आहे. “हा जयद्रथ आणि हा सूर्य”  नगरपरिषद प्रशासन या वाहन मालकावर पुढील रविवार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापूर्वी असाच प्लास्टिक कचरा एका दुकानदाराकडून या ठिकाणी फेकण्यात आला होता. मात्र “तो मी नव्हेच” ही भूमिका दुकानदारांनी घेतली आणि नगरपरिषद प्रशासन काही करू शकले नाही. परंतु आता तर येथे पुरावा समोर आहे. खरंच, साकोली नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष सीओ मंगेश वासेकर यांनी या बेजबाबदार वाहन चालकाचा शोध घेऊन त्यावर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी निसर्गप्रेमी पत्रकार रवि भोंगाणे, आशिष चेडगे, सामाजिक कार्यकर्ते किशोर बावणे, अनिल कापगते, महेश पोगळे यांनी केली आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page