गौतम नगरी चौफेर (बादल बेले राजुरा) – ९ मे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वप्रणाली नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीता प्रणित बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे दि.६ मे ते १६ मे २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना बौद्धिक मार्गदर्शन करण्यासाठी अरुण भेलके, जिल्हा संघटक, आशा वर्कर संघटना
मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी ह. भ.प.स्वामिनी गौरीताई विटोले, अनील चौधरी सहाय्यक प्रशिक्षक, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मोहनदास मेश्राम, सेवाधिकारी, श्री गुरुदेव सेवा मंडळ, राजुरा, विकास कोतपल्लिवार, लोमेश मडावी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राजुरा शहरात हे शिबिर प्रथमच होत असून या शिबिरात १६० मुल – मुली सहभागी झाले असुन त्यांना सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्त्व विकास, आदर्श दिनचर्या, स्वावलंबन, स्वयंशासन व स्वयंपूर्णता इत्यादी गुणाची वाढ व्हावी याकरिता शिबिरातील अभ्यासक्रमात अध्ययनात सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता पठण, समूह गान, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, लाठीकाठी, दांडपट्टा, मनोरे, मराठी हिंदी भजने, स्वागत गीते, ताल, स्वर, हावभाव तसेच सामान्यज्ञान इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होत आहे. अरुण भेलके यांनी शिबिरार्थ्याना जीवनाचे मोल, जीवन जगताना आपल्याला सहकार्य करणाऱ्यांप्रती कृतज्ञ असावे असे आवाहन केले. विद्यार्थांच्या बाल मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांवर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. विवीध गीत, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, क्रांतिकारक यांचे उदाहरण व दाखले देत विध्यार्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोहनदास मेश्राम यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरीता श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने अथक परिश्रम घेतले जात आहे. हे शिबिर निवासी असून शिबिरार्थ्याना वेगवेगळ्या विषयांवर बौद्धिक मार्गदर्शन, चर्चासत्र, मोफत शिक्षण, निवास व्यवस्था, अल्पोपहार भोजन देण्यात येत आहे.



COMMENTS