सोशल मीडियावर ॲड. वामनराव चटप यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण विरूर स्टेशन येथे निषेध सभा

HomeNewsनागपुर डिवीजन

सोशल मीडियावर ॲड. वामनराव चटप यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण विरूर स्टेशन येथे निषेध सभा

विरूर स्टेशन पोलीस ठाण्यात आरोपी वर गुन्हा दाखल

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, जि. चंद्रपूर. दि. २० सप्टेंबर –
                शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह व बदनामीकारक भाषा वापरल्याच्या प्रकाराने शेतकरी संघटना आणि युवकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रकरणी राजुरा आणि विरूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान विरूर पोलिसांनी आरोपी अतुल वरवाडे विरुद्ध कलम २९६, ३५६ (२) अन्वये  गुन्हा दाखल केला आहे.
                सोशल मिडीयावर जेष्ठ शेतकरी नेते यांचेबद्दल बदनामीकारक मजकूर लिहीण्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज विरूर स्टेशन येथे जाहिर निषेध सभा घेतली. या सभेला माजी जि.प. सभापती निळकंठराव कोरांगे, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकरराव  ढवस व पांडूरंग पोटे, शेतकरी युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष ॲड. दिपक चटप, कोरपना पं.स. माजी उपसभापती रवि गोखरे, बाजार समिती संचालक दिलीप देठे, शेषराव बोंडे, देविदास वारे, मंगेश मोरे, अमोल देवाळकर, मारोतराव लोहे, जीवन आमने, जयराज लोखंडे, विशाल जीवतोडे, मारोतराव लोहे, मधुकर चिंचोलकर, कैलास कोरांगे, नरेंद्र मोहारे, मोरेश्वर आस्वले, पुरुषोत्तम अंगलवार, बाबाजी रोहणे, विलास बोबडे, नरेश सातपुते, नरेश गुरनुले, शब्बीर जहागिरदार, रत्नाकर चटप,अनिल चटप, संतोष आस्वले, संतोष डांगे, शामराव काटवले, भास्कर सिडाम, गजानन ढवस, मुरलीधरजी आमने, घनश्याम दोरखंडे, महेश डाखरे, मंगेश गिरसावळे, रामलू नक्कावार, विश्वेश्वर जीवतोडे, खुशाल अडवे, सूरज गव्हाणे, उत्पल गोरे, वैभव कोरडे, पवन मोटघरे, सौरभ मादासवार, यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या नराधमावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात केली.
                यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप हे तीन वेळा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले असून शेतकरी हक्कासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या या नेत्याविरोधात सोशल मीडियावरून केलेली द्वेषपूर्ण पोस्ट दुर्दैवी आहे. संपूर्ण शेतकरी चळवळीवर घाव घालणारी ही बाब असून आरोपीवर कडक कारवाई करावी आणि समाज व शेतक-यांनी अशा नराधमांना वठणीवर आणावे, अहसे मत व्यक्त करण्यात आले. शेतकरी युवी आघाडीने शेतकऱ्यांच्या नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे सांगून कडक कारवाईची मागणी केली.

COMMENTS

You cannot copy content of this page