बंजारा समाजाची अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाची मागणी<br>मराठा आरक्षणाच्या धर्तीवर चंद्रपूर इशारा.

HomeNewsनागपुर डिवीजन

बंजारा समाजाची अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाची मागणी
मराठा आरक्षणाच्या धर्तीवर चंद्रपूर इशारा.

गौतम नगरी चौफेर कृष्णा चव्हाण. जिवती- आज दिनांक 12/9/2025 रोजी शुक्रवार ला अशोक दि जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स व सकल बंजारा समाज आरक्षण चळवळ वतीने राज्य शासनाला निवेदन सादर करून राज्यातील सर्व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे ही मागणी मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षण देण्याच्या अलीकडील निर्णयाच्या धर्तीवर केली असून चंद्रपूरात जिल्हात रास्तारोको आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आले आहे मनोज पाटील जरागे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण मिळाले त्यांचे गॅझेट मध्ये बंजारा समाज एस टी म्हणून नमुद आहे यामुळे त्याचं तत्वावर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात दर्जा देण्यात यावा बंजारा समाजाची संस्कृती भाषा, आणि जिवन शैली, आदीवासी, जमातीशी जुळले आणि हा दर्जा मिळणे न्यायोचित आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2 संप्टेबर 2025च्या शासन निर्णयाचा की,सी,बी,सी,2028/प्र,क्र129/या,व,क मंत्रालय संदर्भा देत ही मागणी केली असुन हैदराबाद गॅझेट मधील एस टी, म्हणून बंजारा समाजाचा पुरावा जोडण्यात आला आहे ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून राज्य सरकारने बंजारा समाज ला न्याय देण्यात यावे यासाठी सरकारवर दबाव आणून हैदराबाद गॅझेट नुसार 1998चा निजामकालीन अध्यादेश मराठा  आरक्षणाला आधार मिळाल्या प्रमाणे, आंध्रप्रदेश, तेलंगण,कर्नाटक, आणि राजस्थान, मध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षण मिळाले आहे महाराष्ट्रात मात्र ते विमुक्त भटक्या, जमाती एन, टी, प्रवर्गात येतात ही मागणी वाढल्याने आरक्षण वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे निवेदन देताना अशोक दिगांबर जाधव राष्ट्रीय महासचिव ऑल इंडिया बंजारा टायगर्स वतीने व सकल बंजारा समाज उपस्थित होते

COMMENTS

You cannot copy content of this page