– नागरीकांच्या आरोग्यास धोका
– वर्षभरापासून केलेल्या मागणीकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष
गौतम नगरीचौफेर बादल बेले राजुरा – राजुरा शहरातील जवाहर नगर माता मंदिर जवळील नालीचे पाणी निघण्याकरीता मोकळ्या जागेत केलेली कच्ची नाली बंद केल्याने नालीतील पाणी वाहून जाण्याचा अडचण निर्माण झाली होती. याबाबत नागरीकांनी वर्षभरापासून नालीचे पाणी वाहते करण्याबाबत विनंती केली होती परंतू नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याने काल झालेल्या पावसामुळे नालीतील सांडपाणी रस्त्यावर पसरले असून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्राप्त माहितीनुसार राजुरा शहरातील जवाहरनगर वार्डामध्ये ज्योतीबा शाळा ते माता मंदिर पर्यत नगर परिषदेने पक्क्या नालीचे बांधकाम केलेले होते. परंतू या नालीचे बांधकाम करतांना पाही वाहून जाण्यास योग्य पर्याय न केल्याने नाली नेहमी तुंबून राहत होती. त्यावर उपाय म्हणून नगर परिषदेने नालीतील पाणी वाहून जाण्यासाठी याठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेतून एक कच्ची नाली खोदलेली होती. त्यातून पाणी वाहून जात होते. परंतू या मोकळया जागेच्या मालकांनी सदर नाली वर्षभरापूर्वी बुजवीली होती. त्यामुळे नाली तुंबून परिसरात दुर्धधीही पसरून नागरीकांना आरोग्यास धोका निर्माण झाला होता. परिसरातील नागरीकांनी सदर नाली वाहती करण्याबाबत नगर परिषदेकडे वर्षभरापूर्वीपासून अनेकदा निवेदने दिली. परंतू नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे सदर नाली पुर्णपणे तुंबली असून नालीतील सांडपाणी रस्त्यावर व परिसरातील घरात पसरले आहे. त्यामुळे दुर्धधी पसरली असून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे त्वरीत लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.
बाक्स – ज्योतीबा शाळा ते सोमनाथपूर या मुख्य मार्गाने अनेक शाळकरी विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. काल आलेल्या पावसामुळे नालीतील सांडपाणी रस्त्यावर पसरले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांडपाण्यातून रस्ता शोधावा लागला. हे सांडपाणर मोकळया जागेतही पसरल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच नागरीकांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर परिषदेने सदर नालीतील सांडपाणी त्वरीत वाहते करावे. मारोतराव बोबडे, जेष्ठ नागरीक, जवाहर नगर राजुरा



COMMENTS