पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाच्या वाढीचा मार्ग मोकळा

HomeNewsनागपुर डिवीजन

पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाच्या वाढीचा मार्ग मोकळा

ज्या एका व्यक्तीमुळे पक्षात अंतर्गत वाद निर्माण झाले होते ज्यांच्या कार्यशैलिमूळे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असा पदाधिकारी भाजपात गेल्यामुळे काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण आहे-गणपत आडे

गौतम नगरी चौफेर हकानी शेख विशेष प्रतिनिधी  जिवती:- नुकतेच काँग्रेस पक्षातील दोन नगरसेवक आणि काँग्रेस चे दोन पदाधिकारी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला डॉ अंकुश गोतावळे जिल्हासरचिटणीस तथा उपाध्यक्ष/गटनेता नगरपंचायत जिवती, तसेच गणपत आडे तालुकाध्यक्ष, विलास पवार सभापती नगरपंचायत, उत्तम कराळे सर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रा सुग्रीव गोतावळे माजी उपसभापती पंचायत समिती जिवती, दत्ता गायकवाड माजी सरपंच, अमोल कांबळे कार्याध्यक्ष युवक काँग्रेस, तिरुपती पोले ओबीसी सेल, सीताराम मडावी अनु. जमाती सेल, विजयकुमार कांबळे अनु. जाती सेल, दिवाकर वेट्टी, प्रदीप कांबळे यांनी संबोधित केले. त्यांच्यासोबत पक्षाचे इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जे नगरसेवक शामराव गेडाम हे भाजप मध्ये गेले ते मुळात भाजपचेच होते, आणी ज्या पक्षाचा आमदार असतो त्या पक्षात ते प्रवेश करीत असतात असाच त्यांचा इतिहास आहे. आणि जे शहराध्यक्ष आशिष डसाने गेले भाजप मध्ये गेले तेही मुळात राष्ट्रवादीचे होते तेही सतत सत्ताधारी पक्षासोबत राहण्यात धन्यता मानतात. पण नगरसेविका तयबबी शेख या  काँग्रेस चे पदाधिकारी अशफाकभाई शेख यांच्या मातोश्री आहेत. अशफाकभाई शेख यांचा बांधकामाचा व्यवसाय असून त्यांची अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात चमत्कार होऊन भाजप चे आमदार झाले आहेत. त्यामुळे अशफाकभाई शेख यांना नवीन कामे घेण्यात अडचण येत होती म्हणून ते अस्वस्थ होते. या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून कदाचित त्यांनी पक्षप्रवेश केला असेल असा अंदाज सर्वांनी मांडला. काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अशफाकभाई शेख यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल प्रचंड नाराजी होती. कारण यापूर्वी काँग्रेस चे जिवती नगरपंचायत मध्ये दहा नगरसेवक असताना असेच भाजप सोबत जाऊन 8 काँग्रेस च्या लोकांना सत्ते पासून वंचित ठेवण्याचा प्रताप अशफाकभाई शेख यांनी केला होता.त्यामुळे अनेक निष्ठावंत आणि जनाधार असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाला होता. या घटनेनंतर जिवती तालुक्यातील अनेक निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या कामापासून अलिप्त झाले होते. आता मात्र अशफाकभाई शेख यांच्या पक्ष सोडण्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण असून जुने कार्यकर्ते यापुढे जोमाने कामाला लागतील असे  मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

COMMENTS

You cannot copy content of this page