जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव : परंपरागत रानभाज्यांतून आरोग्य, पोषण आणि समृद्धीचा संदेश (प्रकल्प संचालक आत्मा भंडारा उर्मिला चिखले

HomeNewsनागपुर डिवीजन

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव : परंपरागत रानभाज्यांतून आरोग्य, पोषण आणि समृद्धीचा संदेश (प्रकल्प संचालक आत्मा भंडारा उर्मिला चिखले

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – महाराष्ट्र शासन, कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि एकात्मिक आदिवासी विकास भंडारा, तालुका कृषी अधिकारी भंडार, उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट २०२६ ला इंद्रलोक सभागृह, भंडारा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांचे संवर्धन, त्यांचे पौष्टिक महत्त्व, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन तसेच आदिवासी व ग्रामीण भागातील महिला आणि शेतकऱ्यांना रानभाज्यांपासून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.

महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या, त्यांची माहिती, पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ तसेच रानभाज्यांचे औषधी व पौष्टिक गुणधर्म यांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात आले.

उपस्थित नागरिक, शेतकरी, महिला बचतगट आणि विद्यार्थ्यांनी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रानभाज्यांमध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले विविध पोषक घटक, खनिजे व जीवनसत्त्वे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत पारंपरिक व स्थानिक अन्नपदार्थांचे महत्त्व अधोरेखित करताना स्थानिक रानभाजीआरोग्याची गुरुकिल्ली आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा नवा मार्ग असा संदेश देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संगीता माने, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा उर्मिला चिखले,
प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक हेडाऊ एकात्मिक आदिवासी विकास अधिकारी भंडारा, सहायक प्रकल्प अधिकारी किशोर बडगे एकात्मिक आदिवासी विकास विभाग भंडारा, जितेंद्र कुमार सरादे जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, मंडळ कृषी अधिकारी यशलव बावनकर भंडारा, मंडळ कृषी अधिकारी पहेला अशोक जीभकाटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी साकोली किशोर पात्रीकर, कृषी तज्ञ भंडारा सुधीर धकाते, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी वृषाली देशमुख, तालुका अभियान व्यवस्थापक सविता तिडके उमेद, कृषी भूषण शेतकरी सेंद्रिय शेती तानाजी गायधने, प्रगतशील महिला शेतकरी यामिनीताई भांडेबुचे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, महिला बचतगट, आदिवासी बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेषता जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज बचत गट भोसा यांनी १२ हजार रुपयांची काटवल आणि इतर रानभाज्यांची विक्री केली तसेच इतर उमेद आणि आत्मा अंतर्गत गटांनी जवळपास ८ हजार रुपयांची रानभाज्यांची विक्री केली सदर महोत्सव मध्ये एकूण २० हजार रुपयांची रानभाज्यांची विक्री करण्यात आली.
रानभाज्यांचे संवर्धन म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन; आणि रानभाज्यांचा आहारात समावेश म्हणजे आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक पाऊल!

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे रीतसर सूत्रसंचालन सतिश वैरागडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा भंडारा, प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी नामदेव काशीद आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एकता मानकर सहाय्यक कृषी अधिकारी भंडार यांनी करून सदर रानभाजी महोत्सवाला २५० नागरिक, महिला शेतकरी आणि रानभाजी खरेदीदार आणि शेतकरी उपस्थित राहून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकशाहीर कार्तिक मेश्राम यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून, लोकवाणीतून रानभाजी महोत्सवांमध्ये रानभाजी चे महत्व त्यामध्ये असलेले जीवनसत्वे खनिजे विटामिन्स आणि आरोग्यदायी महत्त्व याबद्दल सविस्तर सादरीकरण केले.

जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे योग्य नियोजनबद्धतेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय अधिनस्त आदिवासी विकास आत्मा आणि उमीद अंतर्गत अंतर्गत अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांनी योगदान दिले.

You cannot copy content of this page