गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार – येथूनच जवळच असलेल्या गडचांदूर येथील आज, दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी अंमलनाला धरणातील पाण्याची गुणवत्ता तसेच धरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने पाठबंधारे विभाग, चंद्रपूर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

यावेळी धरणातील पाण्याचे नमुने तपासणी, प्राप्त अहवालाचा सविस्तर आढावा व त्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष धरण परिसराची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

धरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजनांबाबत संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करून आवश्यक पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.





