हिरवट पाणीप्रकरणी नगरसेवक रामसेवक मोरे मैदानात; पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत, नागरिकांना संयमाचे आवाहन

HomeNewsनागपुर डिवीजन

हिरवट पाणीप्रकरणी नगरसेवक रामसेवक मोरे मैदानात; पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत, नागरिकांना संयमाचे आवाहन

गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार (“अफवांवर विश्वास ठेवू नका, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही” – नगरसेवक रामसेवक मोरे) गडचांदूर शहरा मध्ये पिण्याच्या पाण्याचा रंग हिरवट दिसत असल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक, नगर परिषद गडचांदूर रामसेवक मोरे यांनी तातडीने पुढाकार घेत परिस्थितीची पाहणी केली असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाण्याचे नमुने जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, चंद्रपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली.
रामसेवक मोरे यांनी सांगितले की, नगर परिषद या संपूर्ण प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असून, तपासणी अहवाल प्राप्त होताच वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडली जाईल. अहवालानुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना तात्काळ राबविण्यात येतील. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा आणि अप्रमाणित संदेशांमुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन करत त्यांनी शक्य असल्यास पिण्याचे पाणी उकळून वापरण्याचा सल्ला दिला. पाण्याच्या रंगात, वासात किंवा चवीत बदल जाणवल्यास तात्काळ नगर परिषदेला माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
“जनतेचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. नागरिकांनी अफवांवर नव्हे, तर नगर परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन रामसेवक मोरे, नगरसेवक, नगर परिषद गडचांदूर यांनी केले.

You cannot copy content of this page