छत्रपती संभाजीनगर येथील अशोक सोनवणे फुले, शाहू , आंबेडकर, ज्येष्ठ विचारवंत यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

HomeNewsनागपुर डिवीजन

छत्रपती संभाजीनगर येथील अशोक सोनवणे फुले, शाहू , आंबेडकर, ज्येष्ठ विचारवंत यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
विशेष प्रतिनिधी भंडारा –
छत्रपती संभाजी नगर येथील फुले ,शाहू ,आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते उत्कृष्ट वक्ते अशोकराव सोनवणे यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची, दखल घेऊन पहेला येथे सन्मान द्या व सन्मान घ्या या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रातील पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार, कवी, शासकीय कर्मचारी , अधिकारी , शाहीर, कलाक्षेत्र व इतर क्षेत्रांमध्ये हे उत्कृष्ट कार्य करतात .परंतु शासन स्तरावर त्यांची दखल घेतली जात नाही म्हणून अशा कार्यकर्त्यांची दखल व्हावी, त्यांच्या कार्याची कदर व्हावी , व त्यांना सन्मान मिळावा , व त्यांच्या कार्याला गती मिळावी या उदात्त हेतूने सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याचा भव्य पुरस्कार सत्कार सोहळा सम्यक बुद्ध विहार पहेला येथील प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. अशोकराव सोनवणे मागील 35 वर्षापासून फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत सक्रिय सहभाग असून सामान्य माणसावर अन्याय झाला तर नेहमी जागरूक असतात त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ , मानाचा फेटा देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ.खुशाल बोपचे माजी खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ , दैनिक माझा मराठवाडा तथा ज्ञानपंख न्यूज चॅनलचे चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर ,फिल्म अभिनेता अश्विनकुमार वघाले, फिल्म अभिनेत्री चैताली भस्मे, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्ण, ब्लू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार संजीव भांबोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ , पुष्पगुच्छ ,मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले .
त्यांच्या या मिळालेल्या जिल्हास्तरीय सन्मान पुरस्कार बद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

You cannot copy content of this page