आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या संविधानविरोधी लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आक्रमक भूमिका

HomeNewsनागपुर डिवीजन

आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या संविधानविरोधी लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आक्रमक भूमिका

गौतम नगरी चौफेर (मुंबई) दिनांक २३ – नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन यशस्वी झालं. त्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर आरक्षणाच्या विरोधातही आंदोलन तापलं होतं. एका संघटनेने आरक्षणाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी काही आंदोलक जंतरमंतरवर आंदोलनासाठी उतरले. परंतु पोलिसांनी आंदोलन मोडीत काढल्याची माहिती मिळतेय. या आंदोलनामुळे देशात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण विरोधात जे लोक भूमिका घेतात;आरक्षण संपवण्याची मागणी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे.आरक्षणाला विरोध म्हणजे संविधानाला विरोध.आरक्षण विरोधी भूमिका घेणारे लोक संविधान विरोधी असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे अशी आक्रमक मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

काही लोक आरक्षण हटवण्याची मागणी करत आहे. आरक्षण हटवण्यासाठी सोशल मीडियावर अभियान चालवलं जात आहे. आंदोलकांकडून जंमरमंतरवर आंदोलन करून आरक्षण हटवण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर आरक्षण हटवणे किंवा त्यात सुधारणा आणण्याची मागणी केली जात आहे. परंतु आरक्षण हटवले जाऊ शकत नाही. आरक्षण आमचा संविधानिक अधिकार आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

You cannot copy content of this page