गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ३ जुलै राजुरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मौजा जोगापूर फाटा परिसरात नाकाबंदी करून मोठी कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण १० लाख ४५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोदर कांबळे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (एम.एच. -३४ बी.आर.०३५८) या कारची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
या प्रकरणी प्रसाद दिनेश गुंडावार (वय ३३, रा. चंद्रपूर) व राजेंद्र प्रेमचंद गुप्ता (वय २९, रा. चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ईगल हुक्का-शिशा तंबाखूचे २७० पाऊच (१,१२,०५० रू. ), होला हुक्का-शिशा तंबाखूचे ४०० पाऊच (१,०६,००० रू.), रजनीगंधा सुपारीचे २,७०० युनिट (२७,००० रू. ) तसेच मारुती स्विफ्ट डिझायर कार (८ लाख) असा एकूण १०,४५,०५० रू. किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये राजुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ५८७/ २०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक इंद्रवर काटकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय कांबळे व गुन्हे शोध पथकातील सपोनि लक्ष्मण लोहरे, सपोनि किशोर तुगराम, पोहवा विवेकी निर्वाण, पोहवा अनुप डोंगरे, पोअ शफीक शेख, मिलिंद जांगळे, महेश बोलगंडेवार, शरद राठोड, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी पार पाडली.

