गौतम नगरी चौफेर (शिवराम पाटील) काल एका अविवाहित तरूणाने माझी ट्युशन घेतली.४५ वर्षांचा उच्चवर्णीय, उच्चशिक्षित,गोरा गोमटा.म्हणाला मुसलमानांनी एकाने चार पाच पोरं पैदा केली तर पुढे भारतात त्यांचाच प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती होईल.आणि तुमच्या मुलांची ,नातवांची सुनता होईल.मला मोहन भागवत आणि संभाजी भिडेंची आठवण झाली.हे पण असेच सांगतात.पण ते स्वतः मात्र अविवाहित राहातात.वास्तवात रहस्य आहे.
खरे तर अविवाहित राहाणे म्हणजे त्याग वगैरे नाही.ती त्यांची मजबूरी बनली आहे.जेंव्हा उपलब्ध असूनही स्वाहा करीत नाहीत त्याला त्याग म्हणतात.
महात्मा फुलेंनी मुलींचे शिक्षण सुरू केले.त्यांच्या मनात चांगले विचार असतील कदाचित.पण पुण्यातील उच्चवर्णीय लोकांनी त्यांना विरोध केला होता.पण ज्यांनी विरोध केला होता त्यांनीच या स्री शिक्षणाचा जास्त लाभ घेतला.मुली शिक्षण घेऊन नोकरीला लागल्या.त्यांनी केरळी,पंजाबी, बंगाली अधिकाऱ्यांंशी परस्पर लग्न जुळवून घेतले.काही सिनेमा कडे वळल्या.त्यांनी उच्चशिक्षित, उच्चवर्णीय मुसलमान अभिनेत्यांशी परस्पर लग्न जुळवून घेतले.लाजे शरमे आईबाप गेले लग्नाला पण नंतर मात्र तोंड लपवत राहिले.ओळख सांगणे टाळले.कौटुंबिक घडी, सामाजिक समतोल आणि धार्मिक तोल ढासळला.आता तिच माणसे मुसलमानांच्या लोकसंख्या विरोधात बोलत असतील तर मला बरे वाटत नाही.कारण याला जबाबदार तर तुम्हीच आहात.
आईबापांचे उत्तरायुष्य पूजापाठ करून पार पडले.पण पुढील पिढीतील तरूणांचे आयुष्य बरबाद झाले.त्यांना लग्नासाठी स्वजातीय,स्वधर्मिय मुली मिळत नाहीत.खूप काही श्रीमंत असेल तर ठिक पण गरीब आणि सामान्य तरूणांचे काहीच भविष्य उरलेले नाही.असे पन्नास टक्के तरूण अविवाहित आहेत.ही अवस्था भयंकर वाईट आहे.
ही परिस्थिती आता मध्यमवर्गीय समाजामधे सुद्धा निर्माण झाली आहे.मुलींचे शिक्षणाचे प्रमाण खूप वाढले.शेतकऱ्यांची तरूण मुले तर लग्नावाचून पार कोडगी झाली आहेत.ज्याच्याकडे पैसा आहे तो चक्क रानावनातून मुली घेऊन लग्न करतो.बरे झाले!बायको तर मिळाली.पण चार सहा महिन्यात ती दागिने घेऊन पोबारा करते.तेथून नवरा,सासरा,सासू यांचेवर खरेदी विक्री चा आरोप करते.म्हणजे पैसा गेला.बायको पळाली.आणि आता अब्रू विकत कोर्टात चकरा मारत आहेत.
या परिस्थितीचे निरीक्षण ,आकलन, अनुमान प्रत्येकाचे विभिन्न असू शकते.जसे महात्मा फुले आणि पुणेरी लोकांचे आकलन , अनुमान विभिन्न होते.पण आता लागलेली आग,तिची कारणे, चटके असह्य होत आहेत.पुढील पिढ्यांचे संवर्धन करायचे कसे?मुलगा दत्तक घ्यावा कि बायको दत्तक घ्यावी?असा पेच पडलेला आहे.महिला स्वावलंबी झाल्यानंतर मात्र कोणालाही दत्तक घेत नाहीत.त्यांना संतती ,कुटुंब,समाज आणि धर्माची गरज वाटत नाही.वंशवृद्धीची गरज वाटत नाही.
तथाकथित समाजधुरीण, धर्ममार्तंड सुद्धा हे जाणून आहेत.पण सत्य सांगण्याचे धाडस करीत नाहीत.ते सुद्धा भयग्रस्त आणि भयगंड अवस्थेत मृत्यू कडे सरकत आहेत.प्रत्येक जण उदारीकरण आणि उदात्तीकरणाचे पोवाडे गात आहेत.पुरूष,कुटुंब,समाज आणि धर्म वगळून, कुटुंब, समाज आणि धर्माला लागलेल्या आगीत फक्त आपली स्वताची पोळी शेकून अडोशाला बसून खात आहेत.
मला वाटते, तरूणांच्या मनातील व्यथा उघड उघड मांडली पाहिजे.कारण तोच तर पुढे या कूटुंबाचा,समाजाचा,धर्माचा घटक आहे.तोच लुळापांगळा झाला तर वृद्ध आईबापाने कोणाच्या खांद्यावर डोके ठेवायचे?
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
८/५/२०२६


COMMENTS