गौतम नगरी चौफेर (हंसराज धोटे) – डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती व आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या माध्यमातून तारीख १९ नोव्हेंबर २०२६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय डॉ आंबेडकर आंबेडकर नगर आवाळपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा १० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात & कार्यक्रमाचे अध्यक्ष या समितीचे सल्लागार मुरलीधरजी वानखेडे होते,या वर्धापनदिन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदाफाटा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष कनिष्क ताकसांडे यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे सरचिटणीस दर्शन बंदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिला धोटे यांनी सांगितले
सर्वाधिक पहिलें डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यांत आली.

या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्यात आलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांची आलेली उदासीनता झटकून एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम धोटे यांनी केले.


नांदा फाटा येथील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष कनिष्क ताकसांडे यांनी सांगितले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा स्थापना) वर्धापनदिन (दिवसाचे महत्व स्पष्पट केले. पुतळा समिती एकसंघ संघटनशक्ती निर्माण करायची असेल तर सुरूवातीपासून पुतळा समितीच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती सोबत घेऊन आपणाला संघटनशक्ती वाढविणे गरजेचे असल्याचे यांनी सांगितले.
पुतळा समिती तर्फे वरचेवर कार्यक्रम बैठकीचे आयोजन होत राहावे. अन्य आंबेडकरी विचारांच्या समुद्रात संगणमत करून विविध कार्यक्रम द्यावे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवून नागरिकांना माहिती देने. अन्य आंबेडकरी विचाराचे पदाधिकारीशी एकत्र येण्याविषयी चर्चा करने या विषयावर सुद्धा उपस्थित कार्यकर्ते यांनी भर दिला.
या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिला मंडळाच्या सहभागी अथक परिश्रम घेतले.

समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच समितीचे सहसचिव प्रज्ञाशिल खाडे, संजोग खाडे, हंसराज धोटे, मयुर जिवने आणि समितीचे उपाध्यक्ष रमेश खाडे, समितीचे कोषाध्यक्ष प्रमोद चांदेकर, समितीचे सदस्य संघानंद धोटे तसेच आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने श्नीमती पुष्पाबाई बदरे, लताबाई वानखेडे, शिला धोटे, चेतना खाडे, शुद्धलेखा खाडे, यशोधरा चांदेकर, शालू धोटे, शितल ठमके, कल्याणी वानखेडे, सविता नारनवरे, धम्माबाई जीवने, सविता बदरे, गिरजाबाई चांदेकर,स् मिता बदरे, चैताली वानखेडे, सोनी सातपुते, श्रेया धोटे, वैशाली खाडे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक दर्शन बंदरे यांनी मानले.

