महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्रदाराकडून अवैध मुरुमाचे उत्खनन शेती सपाटी करण्याच्या नावावर दुसऱ्या जमीनित खोदकाम कसे

HomeNewsनागपुर डिवीजन

महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्रदाराकडून अवैध मुरुमाचे उत्खनन शेती सपाटी करण्याच्या नावावर दुसऱ्या जमीनित खोदकाम कसे

गौतम नगरी चौफेर कोरपना प्रति कोरपणा तालुक्यातील पिपरडा हे आदिवासी पेसा ग्रामपंचायत असून या ठिकाणी सर्वे नंबर २०/ १८ हे सय्यद अहमद अली यांच्या नावाने सातबारा नोंद होती हे मयत झाल्यानंतर यांची मुलगी यांची वारस म्हणून नोंद करण्यात आली परंतु हे कायमचे पिपर्डा येथिल रहवासी नाहीकिंवा गेल्या पाच दशकात यांनी कधीच शेती केली नाही यांची निवड सातबारा आहे या आधारावर बोगस व बनावटी अहवाल तयार करून मुरूम उत्खननाची परवानगी घेण्यात आली सदर जमीन जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम ५३ चे उल्लंघन असून शर्ती भंग झालेले आहेतयाबाबत यापूर्वी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांनी आक्षेप घेऊन त्या ठिकाणी मंडल अधिकारी व तलाठी यांच्यासमोर पंचनामा करून सदर जमीन ही परपोक जमिन ग्रामपंचायत ने 2006 मध्ये वृक्ष लागवडीसाठी त्याचा वापर केला त्या जमिनीवर चारी बाजूने मातीचे टिसीएमखोदण्यात आले या खाली पडीत जागेचा संधीचा फायदा म्हणून त्यांनी बनावटी अतिक्रमण व बोगस ताबा करण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर ज्यांनी कधीच शेती.

कसली नाही अशा व्यक्तीने सर्व बनावटी कागदपत्र तयार करून वर्ग दोनची जमीन वर्ग एक केली एवढेच नव्हे तर ग्रामसभेची ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी नाहरकत न घेता गेल्या तीन दिवसापासून जेसीपी व हायवे द्वारे या आमची शेती आहे म्हणून दाऊद वसीम बेग व मोहम्मद इमरान वसीम बेग नियमबाह्य उत्खनन करून व्यापार थाटला आहे याबाबत ग्रामपंचायतच्या ग्रामसभा दिनांक पाच आठ 2026 रोजी पेसा अंतर्गत आदिवासी ग्रामसभेने सदर सातबारा सरकार जमा करण्याची व शर्तीभंग झालेल्या तसेच कधीच कास्त व शेती केली नसलेल्या अशा अनोळखी माणसाकडून जमिनी खरेदी करून गोरख धंदा सुरू केल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी नाराजी व असंतोष उफाळला आहे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून जोशी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिक यांनी केली आहे यापूर्वी नागरिकांनी आक्षेप असताना ग्रामपंचायतची परवानगी नसताना उत्खननाची परवानगी महसूल अधिकाऱ्यांनी दिलीच कशी निवड पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला अधिकार आहे असं भासवायचं आणि नियमबाह्य खोदकामाच्या परवानगी द्याच यामध्ये कोरपनायेथील महसूल अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने हा गैरप्रकार द डपण्याचा प्रयत्न तसल्यात आरोप गावकऱ्यांनी केला असून गावकऱ्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना पाठवलेले निवेदातून सदर जमीन सरकार जमा करण्याची मागणी केली आहे

You cannot copy content of this page