गौतम नगरी चौफेर कोरपना ता प्र – बहुचर्चित कोरपणा येथील नगरपंचायत च्या सफाई कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी घोटाळा व पगार घोटाळा झाल्याने अनुसूचित जाती जमातीचे कंत्रटदारा कडून सफाई कामगार यांचे शोषण झाल्यामुळे व कंत्राटी कामगार असताना नगरसेवक यांच्याकडून पगार मिळत असल्याने मोठी फसवणूक झाल्याची उघड झाले आहे याबाबत कामगारांनी यापूर्वी जिल्हाधिकारी सफाई कामगार आयोग व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन झालेल्या शोषण व फसवणुकीबाबत सखोल चौकशी करून कामगारांना न्याय द्यावा याकडे लक्ष वेधले याबाबत तत्कालीन कंत्राटदार भूषण देवराव इटनकर व रक्षक सेक्युरिटी या कंत्राटदारांनी केले आठ वर्ष काम करत असताना सफाई कामगारांचे पीएफ रक्कम खात्यावर भरले नाही लाड -पागे समिती अहवालानुसार नगरपंचायत कोरपना येथे अमलबजावणी न केल्यामुळे गेले आठ ते दहा वर्ष कामगारांचे खुलेआम शोषण करण्यात आले काही कामगारांची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक आधार कार्ड स्वच्छता निरीक्षक शंकर तांड्रा यांना दिले असताना त्यांनी जाणून-बुजून पगाराची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर न टाकता कोरपणा येथील नगरसेवकांची हात मिळवणी करून खाजगी सन्मित्र सहकारी बँक या ठिकाणी खाते उघडले मात्र कामगारांनी आजतागायत बँकेत जाऊन कधीच रक्कम उचल केली नाही हे बँकेत असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासणी केल्यास उघड होईल मात्र ही रक्कम परस्पर सुपरवायझर म्हणून घेणाऱ्या किशोर बोर्डे व नगरसेवक नितीन बावणे यांना नेहमी पीएफचे फार्म भरण्यासाठी सह्या करा म्हणून कोऱ्या विड्राल सह्या घेऊन किमान वेतन व ठरल्या नियमाप्रमाणे आम्हाला पगार न देता कामगारांच्य माथी ६००० ते १०५०० रुपये रक्कम देऊन उर्वरित पैसे परस्पर नगरसेवक व कंत्राटदार यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार दरमहा केलेला आहे यामुळे संपूर्ण घोटाळा हा एक कोटी पेक्षा वर रकमेचा असून याच्यामध्ये दोषी असलेल्या कंत्राटदाराची चौकशी करून गेल्या आठ ते दहा वर्षात मासिक पगारातील 12 टक्के भविष्य निर्वाह निधी कुठे जमा केली व केव्हा जमा केली याचा थंग पत्ता नसून संपूर्ण रक्कम संगणमतातून हडप केलेली आहे त्याचबरोबर ठेकेदाराच्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राट करारनामाप्रमाणे सुरक्षा किट आजचा गायत कामगारांना देण्यात आलेले नाही यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची निपक्षपणे चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रशासनाला पूर्व सूचना देण्यात आली असून एक आक्टोंबर पासून काम बंद आंदोलन सफाई कामगारांनी पुकारला आहे कोरपना येथील राजीव गांधी चौकात दिनांक 2 ऑक्टोंबर 2026 पासून सफाई कामगार आपल्या परिवारासह धरणे आंदोलनाला बसत असून न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे यामुळे प्रशासनाने या गंभीर भ्रष्टाचाराची व गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करावा व आमची प्रलंबित देयके तसेच भविष्य निर्वाह निधी रकमेचा तपशील आम्हाला देण्यात यावा अशी मागणी चरणदास पंधरे विशाल धोटे पांडुरंग मेश्राम आनंदराव आपटे बादल भगत राजा आत्राम सुधाकर आत्राम दिगंबर साळुंखे संजय मालेकार प्रकाश सिडाम इत्यादी कामगारांनी केली असून तातडीने प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे त्यामुळे गावातील साफसफाई व स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली आहे

