रिपाइं स्थापना दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन आणि रुग्णालयात फळे वाटप

HomeNewsनागपुर डिवीजन

रिपाइं स्थापना दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन आणि रुग्णालयात फळे वाटप

गौतम नगरी चौफेर//अशोककुमार उमरे //रिपाइं स्थापना दिनानिमित्त गडचांदूर येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन आणि ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे फळे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात धम्मक्रांतीसोबतच जाती धर्म विरहित लोकशाही संविधानानुसार भारत हे लोकशाही गणराज्य (रिपब्लिक) निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्मदीक्षेच्या पंधरा दिवस पहिले तारीख ३० सप्टेंबर १९५६ ला दिल्ली येथील २६ अलिपूर रोड येथील बाबासाहेबांच्या निवासस्थानी आणि बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शेकाफे बरखास्त आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्यात आली. बाबासाहेबांच्या वैचारिक अनुयायी कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन फार मोठ्या प्रमाणात साजरा करून बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.

कार्यक्रमाची सुरुवात गडचांदूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे मा. जी. एस. कांबळे गुरूजी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कांबळे गुरूजींनी स्थापना दिनाचे आणि कार्यक्रमाची भूमिका विशद करण्यात आली. तद्नंतर उपस्थित सहकारी कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळें वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास रिपाइं महाराष्ट्र चिटणीस अशोककुमार उमरे, चंद्रपूर युवा जिल्हाध्यक्ष सुरज उपरे, प्रा. रमेश पाटील सर, जी. एस. कांबळे गुरूजी, कोरपना तालुका संघटक चंपतभाऊ राजूरकर, तालुका कार्याध्यक्ष हंसराज ताकसांडे, जेष्ठ कार्यकर्ते रामदास रामटेके, दिनेश गायकवाड, उमेश गौतम, भीमराव भगत, सुनील वालदे, दशरथ नरवाडे, उपाध्यक्ष वारलूजी नळे, पुरुषोत्तम उपरे, देवराव भगत, अनैशा उपरे, शिवाजी धुपे, बंडू पिपरे, आकाश ताकसांडे, अनंत रामटेके, रामचंद्र सोनटक्के, राजकुमार दुर्गे इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.

You cannot copy content of this page