“फळबागेतून समृद्धीची वाट; आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना साथ! जिल्हाधिकारी सावनकुमार

HomeNewsनागपुर डिवीजन

“फळबागेतून समृद्धीची वाट; आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना साथ! जिल्हाधिकारी सावनकुमार

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा –
कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय फळपीक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रामकृष्ण मंगल कार्यालय, लाखनी येथे करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार होते.

फळपिकांची उत्पादकता, गुणवत्तावाढ, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, पाणी व खत व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन तसेच फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या विषयांवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भगवानराव कापसे केशर आंबा तज्ञ,छत्रपती संभाजीनगर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सादरीकरनाद्वारे कार्यशाळेत मार्गदर्शन सखोल करण्यात आले.

जिल्ह्यात फळपीक लागवडीला चालना देताना शाश्वत व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करणे आणि दर्जेदार उत्पादन घेणे याबाबत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. विविध फळपिकांच्या लागवडीपासून ते काढणीपश्चात व्यवस्थापन व बाजारपेठेपर्यंतच्या बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच मोहम्मद जुबेर अन्सारी कृषि अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया,झोनल ऑफिस छत्रपती संभाजीनगर यांनी उपस्थितांना बँक अंतर्गत असनाऱ्या सुविधा बँक कर्ज, कृषि पायाभूत सुविधा आणि कर्जाचे प्रारूप, प्रकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी कृषि विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,संगिता माने,प्रकल्प संचालक, आत्मा उर्मिला चिखले,वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान साकोली, डॉ. उषा डोंगरवार उपप्रकल्प संचालक अजयकुमार राऊत, उप कृषि अधिकारी किशोर पात्रीकर,साकोली, उप कृषि अधिकारी, भंडारा पद्माकर गिदमारे, कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर आणि आत्मा,कृषि विभाग अधिनस्त अधिकारी-कर्मचारी, तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच जिल्ह्यातील,गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील फळपीक उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक फळपीक तंत्रज्ञानाची माहिती मिळून फळबाग लागवडीला नवी दिशा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी नवी संधी उपलब्ध झाली. सदर जिल्हास्तरीय फळपीक कार्यशाळेचे रितसर सूत्रसंचालन उप कृषि अधिकारी भुमेश नवखरे यांनी, प्रस्तावित प्रकल्प संचालक उर्मिला चिखले यांनी करून आभार प्रकल्प उपसंचालक अजयकुमार राऊत यांनी करून केले.

सदर जिल्ह्यास्तरीय फळपीक कार्यशाळेला जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून सुमारे ४०० फळबाग लागवड करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता कृषि, आत्मा अधिनस्त अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बंधू भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

You cannot copy content of this page