अस्मितेचा एल्गार वंचित शोषितांचे आवाज सामाजिक संघटनेचे परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली साकोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन

HomeNewsनागपुर डिवीजन

अस्मितेचा एल्गार वंचित शोषितांचे आवाज सामाजिक संघटनेचे परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली साकोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन

– दिलीप कांबळे मारहाण मृत्यू प्रकरणात आरोपी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करा

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – साकोली पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 0747/ 2026 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी दिलीप सदाशिव कांबळे यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले आणि दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला .सदर गुन्ह्यात सध्या भारतीय न्याय संहितेचे कलम 105, 351 (2 )तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या तरतुदी लावण्यात आलेल्या आहेत. दिलीप कांबळे यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर सतत बिघडत गेली प्रकृती, रुग्णालयातील उपचारानंतरअखेर झालेला मृत्यू हा वेगवेगळ्या घटनांचा योगायोग नसून एकाच घटनेची परिणामसाखळी आहे अशी आमची ठाम भूमिका आहे. म्हणून या प्रकरणाला केवळ सदोष मनुष्यवधाच्या चौकटीत ठेवणे आम्हाला मान्य नाही .उपलब्ध घटनाक्रम लक्षात घेता आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत खुणाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.

यातील प्रमुख मागण्या 11 सप्टेंबरच्या घटनेची संपूर्ण पुनर्रचना करण्यात यावी, याकरिता मारहाण आणि मृत्यू यातील दुवा सिद्ध करणे हा तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठेवण्यात यावा, पोस्टमार्टम अहवालावर विशेष भर देण्यात यावा, घरी पडल्यामुळे दुखापत झाली अशी सुरुवातीला नोंद कशी झाली याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, मृत दिलीप कांबळे यांनी मारहाण झाल्यानंतर कोणाला काय सांगितले होते याचा शोध घेण्यात यावा, पोलीस पाटील यांच्या भूमिकेची गंभीर चौकशी करण्यात यावी, इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने सुरक्षित करण्यात यावेत, आरोपीला मृत व्यक्तीची जात पूर्वीपासून माहीत होती ही बाब तपासाच्या अभिलेखावर स्पष्टपणे आणण्यात यावी, आरोपीच्या राजकीय प्रभावाच्या तपासावर कोणतीही परिणाम होऊ नये, आरोपी विरुद्ध खुणाचे कलम वाढवून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, तपास केवळ जबाब नोंदवण्यापुरता मर्यादित ठेवू नये वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले .निवेदन देताना परमानंद मेश्राम, दिलीप वानखेडे अमित वैद्य ,सचिन गेडाम, यादवराव गणवीर व असंख्य कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

You cannot copy content of this page