गौतम नगरी चौफेर – कोरपणा येथील ग्रामपंचायतीचा दर्जा वाढ होऊन 2015 पासून नगरपंचायत अस्तित्वात आली ग्रामसेवकाचा कारभार मुख्य अधिकारी यांच्या अधिकारात गेला मात्र कोरपणा येथील कारभारात सुधारणा झाली नाही आपले आरोग्य धोक्यात घालून स्वच्छतेचा वसा घेऊन कष्ट करणाऱ्या सफाई कामगार तीन हजारापासून मानधनावर घंटागाडीपासून काम करत आहे या कामातील कंत्राटदार नावापुरतेच असून येथील पदाधिकारीच सर्व कारभार हाकत असल्याचे खंत सफाई कामगारांनी व्यक्त केली आहे पूर्वी गौरव कंट्रक्शन अर्चना कंट्रक्शन भूषण देवराव इटणकर रक्षक सेक्युरिटीया कंत्राटदारांना काम मिळाला नगरपंचायतीने टाकून दिलेल्या अटी शर्ती सर्व उल्लंघन खुल्या केल्या जात आहे मात्र अनेक वेळा तक्रार करून देखील नगर प्रशासनाने कामगाराच्या प्रश्नाची दखल घेतली नाही यामध्ये स्वच्छता विभागाचे निरीक्षक हे देखील सहभागी असल्याने तेरी बी मेरी भी चूप म्हणत सर्व धाब्यावर ठेवून कष्टाच्या महिन्यातीच्या पैशावर डल्ला मारत असल्याचेउघड झाले आहे केल्या दहा वर्षात आज पर्यंत कामगारांनी ठेकेदारांचा चेहरा पाहिला नाही किंवा ठेकेदारांनी बँक खात्यावर रक्कम पगाराची आरटीजीएस करून दिलेली नाही निरीक्षक यांच्याकडे सर्व सफाई कामगारांनी राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक देऊन सुद्धा बळजबरी व जबरदस्तीने सन्मित्र महिला सहकारी बँकेत खाते उघडण्यास भाग पाडले आजपर्यंत कधीही बँकेत जाऊन सफाई कामगारांनी पगाराची रक्कम उचल केली नाही मात्र सुपरवायझर व एका नगरसेवकांनी वेळोवेळी कामावरून काढून देण्याच्या धमक्या देत विड्रालवर सह्या घेऊन रक्कमे चा अपहार व गैरप्रकार केल्याच्या तक्रारी निवेदनातून कामगारांनी केली आहे जून महिन्यामध्ये बँकेच्या खात्यावर 48 हजार रुपये जमा करण्यात आले मात्र ही रक्कम परस्पर विड्राल करून कामगारांना दोन महिन्याचे पगार म्हणून फक्त एकवीस हजार रुपये माती मारण्यात आले व बाकीचे 27 हजार रुपयाची प्रत्येक कामगाराकडून हळप करण्यात आलेले आहे हा प्रकार गेल्या दहा वर्षापासून सुरू असून हा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन कामात झाल्याचा आरोप कष्ट करणाऱ्या व कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये जीव धोक्यात ओतून काम करणाऱ्या कामगारांचे शोषण सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप केल्या जात आहे सदर कामगारांना सुरक्षा किट आजपर्यंत एकही कंत्राटदाराने दिलेले नाही .

तसेच गेल्या दहा वर्षात भविष्य निर्वाह निधी पीएफची रक्कम कपात केल्या गेल्याचे सांगितले जाते परंतु याबाबत चौकशी केली असता पीएफची रक्कम खात्यात जमा न करता परस्पर हडप केल्याचे उघड झाले आहे यामुळे गावांमध्ये गेल्या दोन वर्षापासून दोन वाहन नादुरुस्त असून नगरपंचायतीने 17 वार्डाचा कारभार फक्त दोन वाहनाच्या भरोशावर सफाईचे काम चालविले मात्र यामध्येही शुल्लक नादुरुस्तीसाठी नगरपंचायतीकडे वाहन दुरुस्ती करण्यासाठी निधी नाही का असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे यामध्ये भविष्य निर्वाह निधीचा महा घोटाळा झाला असून त्यांच्या भविष्यातील सपनाला चकणाचूर करण्याचं काम नगरपंचायतीच्या सत्ताधारी नगरसेवक व नगर प्रशासनाने केल्याची खंत कामगारांनी व्यक्त केली आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी नगरपंचायतीचे गटनेते गिताताई डोहे किशोर बावणे व सामाजिक कार्यकर्ते यांनी कंबर कसली असून 2 ऑक्टोंबर गांधी जयंती रोजी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू करीत असल्याचा इशारा लेखी पत्रातून दिलेला आहे नगरपंचायतीमध्ये समाजसेवेचा आव आणणाऱ्या व आम्ही समाजाच्या कामामध्ये मदत करतो म्हणणाऱ्या नगरसेवकांचे स्वच्छता कामामध्ये पवित्र अशी जबाबदारी निभावणाऱ्या कामगारांचे पगाराचे पैसे सुद्धा हडपण्याचा डाव म्हणजे साताऱ्याला लुटून पुण्याला दान करणे हाच प्रकार दिसतो याबाबत कामगारांनी कंबर कसली असून आम्ही मेलेली जनावरे कुत्रे मांजर ओढून बाहेर फेकतो शौचालय साफ करतो नाल्यातील विचित्र असा आरोग्याला धोकादायक असा घनकचरा स्वच्छ करतो मात्र गेल्या दहा वर्षात आम्ही एकाही कंत्रदाराकडून बँक खात्यावर किंवा कत्रदारांनी आम्हाला पगार दिला नाही या गावचे नगरसेवक नितीन बावणे व त्यांच्या परिवाराने आम्हाला आजपर्यंत पगार दिला आहे त्यामुळे सदर सताधाऱ्यानी आर्थिक लाभासाठी नावा पूरते कंत्राटदार दाखवून स्वतःच घनकचरा व्यवस्थापनाचे काम केले आहे असा या आरोप दिलेल्या तक्रारीत सफाई कामगार दिंगाबर सोळुंके सुधाकर आत्राम पांडुरंग मेश्राम आनंदराव आपटे संजय मालेकार बंडू लसन्ते चरणदास पंधरे व इतर कामगार यांनी दिला आहे







