सोशल मीडिया पोस्ट अतिवृष्टीग्रस्त भागांची नगरपरिषद अध्यक्ष निलेश ताजने प्रत्यक्ष पाहणी

HomeNewsनागपुर डिवीजन

सोशल मीडिया पोस्ट अतिवृष्टीग्रस्त भागांची नगरपरिषद अध्यक्ष निलेश ताजने प्रत्यक्ष पाहणी

(गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार) – सोशल मीडिया पोस्ट अतिवृष्टीग्रस्त भागांची नगरपरिषद अध्यक्ष निलेश ताजने सोबत बांधकाम सभापती रामसेवक मोरे यांनी प्रत्यक्ष पाहणी नागरिकांना तातडीने दिलासा गडचांदूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक वार्डांमध्ये पाणी साचणे, रस्त्यांवर चिखल होणे तसेच काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद गडचांदूरचे अध्यक्ष मा. निलेश ताजने व बांधकाम सभापती रामसेवक मोरे यांनी संबंधित वार्डांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. घरांमध्ये शिरलेले पाणी, बंद झालेले नाले, पाणी साचण्याची ठिकाणे तसेच रस्त्यांची झालेली दुरवस्था याची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या गांभीर्याने ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनाही घटनास्थळी बोलावून पाणी उपसा, नाल्यांची स्वच्छता, अडथळे दूर करणे, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करणे तसेच आपत्कालीन मदत तत्काळ पोहोचविण्याचे आदेश देण्यात आले. अनेक ठिकाणी तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्यात आला.
नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येवर तत्परतेने उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
“जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर – समस्या ऐकून त्वरित निराकरण, हेच आमचे ध्येय.”

You cannot copy content of this page