जनजागर संघटना साकोली च्या वतीने जागतिक संगीत दिवस साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

जनजागर संघटना साकोली च्या वतीने जागतिक संगीत दिवस साजरा

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे विशेष प्रतिनिधी – जनजागर कला साहित्य बहू उद्देशीय संस्था साकोलीच्या वतीने जेष्ठ नाट्य कलावंत तथा माजी जी.प.सदस्या भुमालाताई उइके यांचे राहते घरी साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम नटेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच तबला,हार्मोनियम, ढोलक, ऑर्गन, ऑक्टोपॅड गिटार, टाळ, या संगीत वाद्यांचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर संगीतमय वातावरण मध्ये नटेश्वराची नादी सादर करण्यात आली,.
त्यानंतर उपस्थित कलावंतांनी विविध प्रकारचे गीते सादर केले व जल्लोषात जागतिक संगीत दिवस साजरा करण्यात आला.

त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष भावेश कोटांगले यांनी वर्षभर ज्या संगीत वाद्यांच्या भरवशावर आपण आपला उदरनिर्वाह करतो त्या संगीत वाद्यांची आजच्या जागतिक संगीत दिनानिमित्त पूजा अर्चना झाली पाहिजे असे मत व्यक्त केलं.

त्यावेळी जनजागर कला साहित्य बहुउद्देशीय संस्था साकोलीचे अध्यक्ष भावेश कोटांगले, ज्येष्ठ नाटय कलावंत आता माजी. जि प सदस्या भूमालाताई उइके, जेष्ठ नाट्य कलावंत पदमा जायस्वाल, प्रियंका ठवरे, प्रतिभा साखरे, संघटनेचे उपाध्यक्ष उमेश भोयर, संचालक संदीप नागदेवे, संदीप कोटांगले, इंद्रजित लांजेवार, साकोली तालुका अध्यक्ष नीलाराम बागडे, उपाध्यक्ष पुण्यशील कोचे, अरविंद कांबळे, विनोद मुरकुटे, सोनू मेश्राम, मनोज बोपचे,सिराज पठाण, संकल्प कोटांगले, आरुष कोटांगले उपस्थित होते.

You cannot copy content of this page