गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२१ जून ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा व्दारा संचालित ॲड यादवराव धोटे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन सकाळी ६ ते ७ या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले सदर उपक्रम
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केल्यापासून जागतिक स्तरावर योगप्रशिक्षणास व योगसाधनेला नवे वलय प्राप्त झाले आहे.बदलत्या जीवनशैलीच्या अनुषंगाने शरीर व मनाच्या समतोलासाठी योगशास्त्र एक सशक्त साधन ठरते. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक उत्कर्षासाठी योगाची भूमिका अतुलनीय आहे.
कार्यक्रमामध्ये पतंजली योग समितीचे प्रशिक्षक अरुण जमदाडे तसेच प्रशिक्षिका प्रेमीला हेले यांनी मार्गदर्शनपर योग प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांना योगाचे तंत्र, तत्वज्ञान व उपयुक्तता यांचे मार्मिक विवेचन केले व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. एक तास चाललेल्या या सत्रात योगासनांची शुद्धता, प्राणायामाची शैली आणि ध्यानधारणाचे सादरीकरण घेण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे उपस्थित होते. तसेच क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अल्पना कवाडे,प्रा. रेणुका देशकर, प्रा. गोविंद झाडे, प्रा. मंगेश कुळमेथे, स्वच्छता विभाग प्रमुख प्रा. धनंजय डवरे, संचित वाघमारे, कमलाकर पायपरे, कर्मचारी वृंद आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. धनंजय डवरे व आभार प्रा. रेणुका देशकर यांनी केले.हा योगदिन उत्सव उपस्थितांना नवचैतन्य व आरोग्यविषयक साक्षरतेचा नवा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली.

