आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे योग दिवस उत्साहात साजरा.

HomeNewsनागपुर डिवीजन

आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे योग दिवस उत्साहात साजरा.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२१ जून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चनाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. २१ जून २०२६ रोजी जागतिक योग दिनानिमित्त आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा येथे योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ६.३० वाजता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन तसेच विविध श्वसनक्रिया उत्साहाने सादर केल्या.
“योग करा, निरोगी रहा” हा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक दिपक किसन सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक मडावी यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले व सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला.

You cannot copy content of this page