आरपीआय आठवले गट च्या शिष्टमंडळाने घेतली भोंदू बाबाची दखल.

HomeNewsनागपुर डिवीजन

आरपीआय आठवले गट च्या शिष्टमंडळाने घेतली भोंदू बाबाची दखल.

• राष्ट्रीय अध्यक्ष दयाल बहादुरे महाराष्ट्र सचिव बाळकृष्ण गायकवाड यांनी भोंदू बाबाच्या जन्मगावची केली पाहणी.
श्रीकृष्ण देशभ्रतार “गौतम नगरी चौफेर”  नागपूर/भंडारा :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र सचिव बाळकृष्ण गायकवाड मामा ,विनोद थोरात महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष, अदिवासी संघटनेचे अशोक,जयवंत शेलार,मीडिया शहरणामा चे प्रतिनिधी सागर सांगळे यांच्या सह भोंदूबाबा अशोक खरात यांचे जन्मगाव मु, काहंडाळवाडी ता. सिन्नर जिल्हा नासिक येथे भेट दिली. त्याचा जन्म १९६५ वर्षाचा आहे १० वी नापास झाल्यावर त्यांनी ते गाव सोडले ह्या गावात घेगडमल कुटुंब बौद्ध समाजाचे किरण,नितीन,आणि सचिन राहायला आहेत त्यांच्या घरी जाऊन माहिती घेतली. आणि मु,वावी ता.सिन्नर येथील नूतन विद्यालयात १० व्या वर्गा पर्यंत शिक्षण झाले त्या शाळेत भेट दिली
१९८३ मध्ये तो ह्या शाळेत होता. मु.मिरगाव ता सिन्नर या ठिकाणी २०१० मध्ये अशोक खरात यांनी शिवाणीक संस्था स्थापन करून ईशानेश्वर मंदिर बांधले मंदिराला लागूनच आंब्याची बाग लावली आणि त्या ठिकाणीच स्वतःला राहण्यासाठी बंगला बांधला त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

COMMENTS

You cannot copy content of this page