अवैध धंदे जोमात, ठाणेदार मात्र कोमात

HomeNewsनागपुर डिवीजन

अवैध धंदे जोमात, ठाणेदार मात्र कोमात

अवैध दारू सट्टा खुले आम प्रहारचे बिडकर यांचा आरोप
गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – कोरपणा तालुक्यातील गडचांदूर शहर हे मोठे औ‌द्योगिक शहर असून मोठ्या प्रमाणत ट्रान्सपोर्ट आहेत. गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खान आहेत यात मोठ्या प्रमाणत कोळसा चोरी होत असतो मोठ्या प्रमाणात ट्रक ची ये जा असते त्यात डीझेल चोरी सुद्धा होत असते भोयेगाव जवळ असलेल्या धाबा हॉटेल व भोयेगाव कवठाळा मधात पेट्रोल पंप जवळील पंचर दुरुस्ती दुकानात अवैध डीझेल विक्री सुरु असते त्याच ठिकाणी अवैध दारू सुद्धा विकली जाते

गडचांदूर पोलीस ठाण्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सूरु असल्याने ठिकठिकाणी अवैध दारू विक्री, सटापटी, गुटखा, सुगंधित तंबाकू, जूगार, या, सारखे यूवापिडीच्या जिवनाशी खेडणारे व कँसरला आमंत्रित करणारे अवैध धंधे मोठ्या प्रमाणात सूरू असून या कडे गढचांदुर येथील ठाणेदार दुर्लक्ष करीत असताना दिसते.रात्र पाळीत सूरू असलेले तसेच गढचांदुर येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सूरू असल्याने गर्दीचे स्वरूप पहायला मिळत असून कोणत्याही नागरीकांचे अपघात होऊ नये व कोणाचाही नाहक बळी जाऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याची गरज असून वाहतूक नियंत्रणाकडे ठाणेदाराचे दूर्लक्ष होत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही गडचांदूर शहरात अवैध धंदे जोमात सुरू असून पोलीस विभाग कोमात आहे कि काय असा सवाल बिडकर यांनी. केला अवैध धंदे बंद करण्याची मागणी बिडकर यांनी पोलीस अधीक्षक यांना केली,

ठाणेदार यांच्या आशीर्वादाने अवैध मुरुम, जुगार, गोहत्या,गो तस्करी, वाळू तस्करी, सट्टा पट्टी, झंडी मुंडी, अवैध वाहतूक, अवैध डीझेल, अवैध दारू, गांजा, गुटखा, सुगंधित तंबाखू तर पोलीस ठाण्याच्या गेटलाच लागून मिळतो यांसारख्या बेकायदेशीर कामांमध्ये  ठाणेदार निर्भयपणे सामील आहे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दारू गुटखा, सुगंधित तंबाखू, गांजा याच्या आहारी जात आहे आणि ठाणेदार या कामांना पूर्ण पाठिंबा देऊन प्रोत्साहन देत आहेत.
सटा पट्टी, झंडी मुंडी ठाणेदाराच्या आशीर्वादाने खुले आम सुरु आहे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ठानेदाराचे आर्थिक हित दिसत असून ठाणेदाराची तीन वर्षाच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. व तत्काळ ठाणेदार कदम यांची बदली करून योग्य व कार्तव्यदर्शक अधिकारी नेमण्यात यावेळ अशी मागणी पोलीस  अधीक्षक यांच्या कडे प्रहारचे जिल्हा प्रमुख बिडकर यांनी केली.

COMMENTS

You cannot copy content of this page