– पत्रकार संजीव भांबोरे यांनी शेतकरी श्रीधर शहारे यांच्याशी केली चर्चा
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – तालुक्यातील चिखलपहेला येथील शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून गजानन खरवाडे ते किसन कांबळे या १ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय व्यवस्था असून शेतकऱ्यांना या रस्त्याने पायदळ सुद्धा चालता येत नाही. अत्यंत चिखलमय परिस्थिती रस्त्याची आहे. या रस्त्याने शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे करण्याकरता नेहमी जावे लागते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी किती त्रास सहन करावा .? याबाबत पत्रकार संजीव भांबोरे यांनी येथील शेतकरी श्रीधर शहारे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्या रस्त्याबाबत विचारणा केली असता मागील अनेक वर्षापासून या रस्त्याने आम्ही शेतकरी जात असतो परंतु साधा चालायला सुद्धा आम्हाला स्वातंत्र्याच्या 76 वर्षात नंतर सुद्धा शेतकऱ्यांकरिता जगाचा पोशिंदा असलेल्या शेतात जाण्याकरता रस्ता नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते व बारिश मध्ये हा रस्ता चिकलमय असतो त्यामुळे या रस्त्याची तात्काळ सुधारणा करण्यात यावी असे मागणे शेतकरी करीत आहेत . यावेळी कुलदीप गंधे उपस्थित होते

