गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा , दि.२५ सप्टेंबर
दिनांक २५ सप्टेंबर ला शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवाडा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रस्ते सुरक्षा जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम पाळणे, हेल्मेटचा वापर करणे, रस्ता ओलांडताना काळजी घेणे तसेच वाहतूक चिन्हांची माहिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याची तसेच आपल्या कुटुंबियांमध्ये व समाजामध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण होऊन जबाबदार नागरिकत्वाची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक संध्या रिंगणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

