विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.

HomeNewsनागपुर डिवीजन

विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२३ सप्टेंबर रोटरी क्लब राजुरा आणि क्रेसाल इंटरप्राईजेस, एमआयडीसी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना येणाऱ्या विविध शारीरिक अडचणी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, योग्य आरोग्यविषयक सवयी तसेच या नैसर्गिक प्रक्रियेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याबाबत कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या मनातील प्रश्न व संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
यावेळी स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. रितू गिरसावळे यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, स्वच्छता, आरोग्यविषयक सवयी आणि विविध अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व सोबत मुलींना मोफत नॅपकिनपॅडचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला श्री शिवाजी महाविद्यालय, राजुराचे उपप्राचार्य राजेश खेरानी, शिवाजी हायस्कूल, राजुराचे मुख्याध्यापक खामनकर, प्रसिद्ध डॉ. नितीन सावलिया, डॉ. रितू गिरसावळे, तसेच क्रेसाल इंटरप्राईजेस, एमआयडीसी चंद्रपूरचे जनरल मॅनेजर हेमंत कुमार तेलंग, सेल्स मॅनेजर समीप बांदे, संकेत शेंडे, शिल्पा रंगारी, रुबीना आलम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे, सचिव किशोर हिंगाणे, माजी अध्यक्ष कमल बजाज, वैशाली हिंगाणे, दमयंती इंगोले तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या आरोग्याशी निगडित असलेल्या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लब राजुरा आणि क्रेसाल इंटरप्राईजेस यांनी घेतलेला हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे सदस्य केतन जुनघरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक खामनकर यांनी केले.

You cannot copy content of this page