सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय आश्रमशाळा देवाडा येथे उत्साहात वृक्षारोपण.

HomeNewsनागपुर डिवीजन

सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय आश्रमशाळा देवाडा येथे उत्साहात वृक्षारोपण.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२३ सप्टेंबर
पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान ‘ अंतर्गत दिनांक २२ सप्टेंबर रोजी शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवाडा येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या उपक्रमांद्वारे शाळा परिसर आणि वसतिगृह परिसरात विविध प्रकारच्या बहुगुणी रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ माध्य. मुख्याध्यापक संध्या वामनराव रिंगणे यांच्या हस्ते वृक्षपूजन करून करण्यात आला. यावेळी सेवा संकल्प अभियाना च्या माध्यमातून पर्यावरणाचा वारसा जपणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रूजवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले. “सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आपल्याला केवळ रोपे लावायची नाहीत, तर ती झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संगोपन करायचे आहे. विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाते जोडून पर्यावरणाच्या रक्षणासाठी नेहमी पुढाकार घेतला पाहिजे.” या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला.

You cannot copy content of this page